गुहागरमधील एमआयडीसीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या देवघर गावात एमआयडीसी भू संपादन अधिकारी गेले आसता ग्रामस्तानी तीव्र विरोध करीत भू संपादन प्रक्रिया बंद पाडली. याच वेळी MIDC अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करत प्रस्तापित MIDC ला विरोध करीत कडवट आंदोलनाचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 5, 2014, 11:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या देवघर गावात एमआयडीसी भू संपादन अधिकारी गेले आसता ग्रामस्तानी तीव्र विरोध करीत भू संपादन प्रक्रिया बंद पाडली. याच वेळी MIDC अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करत प्रस्तापित MIDC ला विरोध करीत कडवट आंदोलनाचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रामधील सर्वात मोठी MIDC कोकणात रत्नागिरीमधील गुहागर मतदार संघात सरकारने होऊ घातली आहे ७ हजार ५०० हेक्टर जागा भू संपादन प्रक्रिया सरकारच्या वतीने सुरु झाली आहे. शेतकऱ्यांचा भूसंपादनाला प्रचंड विरोध आहे. आंबा काजू केळी बागा आणि सगळेच शेतकरी भात शेती करतात अशा जागेवर कृषीवर आधारित उद्योग निर्माण करण्याऐवजी कारखानदारी आणण्याचा घाट सरकारने घातलाय.
या घाटामुळे निसर्गाच्या हानीबरोबरच शेतकरी उद्वस्त होणार असल्याने प्रस्थापित MIDC च्या १४ गावातील शेतकऱ्यांनी विरोधाची आक्रमक आंदोलनाचा निर्णय घेतलाय कोणत्याही परिस्थितीत जमीन न देण्याचा आक्रमक पावित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय प्रचंड घोषणा देत आजची भू संपादन प्रक्रिया शेतकऱ्यांनी बंद पाडली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.