जपाननं नाकारला रत्नागिरीचा हापूस!

कोकणातली अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाने आंब्यावर मोठा परिणाम झालाय. त्यातच आंब्यावर कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 14, 2014, 09:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
कोकणातली अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाने आंब्यावर मोठा परिणाम झालाय. त्यातच आंब्यावर कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झालाय. आंब्यावर प्रदूषणाचा परिणाम होत असल्याचं कारण देत यंदा जपानने कोकणातला आंबा नाकारलाय. आंबा उत्पादकांसाठी ही चिंतेची बाब आहे.
अवघ्या महाराष्ट्राला गारपिटीने झोडपलंय तर अवकाळी पावसाने आंबा खराब केलाय. त्यातच आता या फळांच्या राजासमोर एक वेगळंच संकट उभं राहिलंय. कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्यावर होत असल्याचं कारण देत जपानने कोकणच्या राजाला जपान प्रवेश नाकारलाय. कोकणातून दरवर्षी दोन लाख मेट्रीक टन इतकी आंब्याची निर्यात होते. मात्र, आता जपानने नाकारलेला आंबा हा एक मोठा अलार्मिंग सिग्नल आहे.
कोकणात पूर्वी मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन होत असे. अमेरिका, दुबई, जपान यासारख्या देशात आंबा निर्यात होतो. मात्र, यंदा आंब्याच्या मागणीवर परिणाम होताना दिसतोय. कोकणात वाढत असलेले अनेक प्रोजेक्ट, त्यातून निघणारा केमिकलयुक्त धूराचा आंब्याच्या क्वॉलिटीवर परिणाम होतोय, असं पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचं म्हणणं आहे.
 
गेल्या काही वर्षात आंब्यावर पर्यावरणातल्या बदलाचा परिणाम पाहायला मिळतोय. त्यातच आता आंब्याला जपानने नाकारलेली एन्ट्री ही काळजीची बाब आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.