www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरीतील वाळूवरील बंदी उठविण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये वाळू उपशाला परवानगी देण्यात आली.
जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली. मंडणगड, दापोली गुहागर आणि रत्नगागिरी तालुक्यात आता हातपाटीनं वाळू उपसता येणार आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे.
याच चारही तालुक्यांमध्ये यापूर्वी चिरे उत्खननावरची बंदी उठवण्यात आली होती. आता वाळू हातपाटीची परवानगी मिळाली असली तरी बहुतेक ठिकाणी बेकायदेशिररित्या सक्शन पंपाने वाळू उपसली जाते. यावर नियंत्रण कसं आणणार यावर कोणीही बोलायला तयार नाहीये. हातपाटीनं जर १० टक्केही वाळू उपसा होत नसेल तर अशा परवानगीचा उपयोग काय, असाही सवाल उपस्थित होतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.