www.24taas.com,रत्नागिरी
गणपतीपुळे येथील समुद्रात बुडालेल्यांपैकी आणखीन दोन पर्यटकांचे मृतदेह सापडले. त्यामुळे गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू पावलेल्यांची संख्या सातवर पोहचली आहे.
गणपतीपुळेतील समुद्रात शनिवारी एकूण १२ पर्यटक बुडाले होते. ते पर्यटक पनवेल, शहापूर आणि सोलापूरमधील होते. बुडालेल्या १२ जणांपैकी पाच जणांना ग्रामस्थांनी वाचविले. सातजण मात्र बेपत्ता होते. त्यापैकी तिघांचे मृतदेह शनिवारी सायंकाळी बाहेर काढण्यात आले. रविवारी सकाळी एकाचा मृतदेह सापडला तर आणखीन एकाचा मृतदेह सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सापडला.
सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास आणखी दोन मृतदेश सापडले. गणपतीपुळे समुद्रात एकूण सात जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यामध्ये संगम आवळे (२६, जुना पनवेल), विनायक रंगापुरे (रा. पुणे), अमोल बिमरथी (२७, रा. सोलापूर), अनिल केदार (२६, रा. शहापूर), संतोष भुवड (२६, रा. पनवेल), केशव राजिवडे (२९, जुना पनवेल), अमित चवळे (२७, सोलापूर) यांचा समावेश आहे.
दरम्याने गेल्या वर्षभरात १२ जणांचे बळी गेले आहेत.गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर वारंवार पर्यटकांना सूचना देऊनही बुडणार्यांचे प्रमाण वाढत आहेत. सात पर्यटक बुडून मृत्यू पावल्याची ही मोठी घटना आहे.