www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
कल्याणच्या पत्री पूल परिसरात गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाईपलाइन फुटली असल्यानं लाखो लीटर पाणी वाया जातंय. ऑक्टोबर हिटमुळे अनेकजण फुटलेल्या पाईपलाइन जवळ आंघोळीचा आनंद लुटतायेत. असे असताना अधिकाऱ्यांचा ऊर्मटपणा दिसून आला.
गेले दहा ते बारा दिवसांपासून ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी एमआयडीसीचे कर्मचारी इथं फिरकलेसुद्धा नाहीत. या संदर्भात झी मीडियाने एमआयडीसीचे अधिकारी नितीन वानखेडे यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी पाईपलाईन दुरुस्तीबाबत ठोस पावलं उचलण्याऐवजी वानखेडे यांनी झी मीडियाशी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला.
वाया जाणाऱ्या पाण्याचे चित्रिकरण करणाऱ्या कॅमेरामनला कॅमेरा बंद करण्याचा दमही दिला. मात्र, झी मीडियाने वाया जाणाऱ्या पाण्यावर अधिकाऱ्याची पोलखोल केल्यानंतरर सुस्त अधिका-यांना जाग आली आणि पाईपलाईन दुरुस्तीसाठी कर्मचारी पाठवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ