www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे महापालिकेच्या पोटनिवडणूकीसाठी आज मतदान झालंय..त्यामध्ये एक प्रभाग मुंब्रा तर दुसरा प्रभाग कोपरी असा आहे.या निवडणुकीत मुंब्रा प्रभागातून राष्ट्रवादीला चांगले मतदान पडेल असे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे या प्रभागात जास्त चुरस नव्हती. परंतु ठाण्यातील कोपरी भागातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
ठाण्याच्या सत्तेचं समीकरण बदलणारी पोटनिवडणूक आज पार पडली.यामध्ये महायुती असो की लोकशाही आघाडी जोर सर्वानीच लावला..कारण ही निवडणूक ज्याच्या खिशात जाणार सत्ता त्याचीच येणार असं गणित इथं लावलं जातय.तसेच येणा-या आमदारकीच्या निवडणूकीत काँग्रेसचे रवींद्र फाटक यांच्या विरुद्ध सेनेचे आमदार एकनाथ शिंदे अशी महत्वाची लढत होणार आहे. त्यामुळे ही पोट निवडणूक या दोघांसाठी आमदारकीची रंगीत तालीम आहे..या दोन कारणांसाठी ठाण्यातील दिग्गज नेते थेट निवडणूकीसाठी रस्त्यावर उतरले होते. एकीकडे सेनेच्या समर्थनात दिग्गज मंडळी रस्त्यावर उतरल्यानं आघाडी कशी स्वस्थ बसणार...आघाडीचेही अनेक दिग्गज आपल्या उमेदवाराच्या समर्थानात रस्त्यावर उतरले होते.
या पोटनिवडणूकीसाठी सर्व ठाण्यातील दिग्गज मंडळी आज पूर्ण दिवस ठाण्यातील कोपरी भागातच होते. या आधी ठाण्यात कधीच अशा साध्या पोट निवडणुकीसाठी एवढी नेते मंडळी कधी आली नव्हती.. या प्रभागाच्या पोट निवडणुकीत युती असो किवा आघाडी दोघांची इभ्रत पणाला लागली आहे. त्यामुळे याचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलंय..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.