मनसेनेनं राज्यपालांना घेरलं तर सेनेचा हांडा मोर्चा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने आपला आक्रमकपणा दाखवून देण्यास सुरूवात केलेय. पहिल्याच दिवशी राज्यपालांना घेराव मनसेकडून करण्यात आला. तर शिवसेनेने मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. दुष्काळ समस्या सोडविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सेनेने केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 12, 2013, 06:29 AM IST

www.24taas.com,मुंबई
अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने आपला आक्रमकपणा दाखवून देण्यास सुरूवात केलेय. पहिल्याच दिवशी राज्यपालांना घेराव मनसेकडून करण्यात आला. तर शिवसेनेने मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. दुष्काळ समस्या सोडविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सेनेने केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरूवातीलाच दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधा-यांवर हल्लाबोल केलाय. आक्रमक विरोधकांनी आज सकाळीच विधान भवनावर जोरदार घोषणाबाजी करत रिकामे हंडे घेऊन मोर्चा काढला.
राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना राज्य सरकार मात्र कुठलीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला. सरकार निष्क्रीय ठरल्यामुळं सरकारला रिकामा हंडा भेट देण्यासाठी आणला असल्याचा संताप निलम गो-हे यांनी व्यक्त केला.
तर दुसरीकडे मनसेनं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मराठीसह प्रादेशिक भाषा वगळल्यानं मनसेनंही आक्रमक भूमिका घेतली. राज्यपाल अभिभाषणासाठी विधान भवनावर आलेले असताना मनसे आमदारांनी त्यांची गाडी अडवून घेराव घातला.

तसंच मराठीला वगळण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळं यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दुष्काळ आणि मराठीच्या मुद्यावर गाजणार असल्याचं चित्र दिसतंय.
या अधिवेशनात दुष्काळाचाच मुद्दा प्रामुख्यानं गाजणार असल्याची चुणूक पहिल्याच दिवशी दिसतेय. सकाळी साडेदहाच्या सुमारास वाळलेलं गवत आणि रिकामे हंडे घेऊन सेना-भाजपचे विधानभवनात मोर्चानं दिसून आली. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 9 विधेयकं मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.