www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
तुम्हीही फास्ट फूड आणि चॉकलेटसाठी अक्षरश: वेडे आहात? आणि समोर आलं की फस्त केल्याशिवाय तुम्हाला राहावत नाही? उत्तर `हो` असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे... आणि तुम्हाला स्वत:ची यापासून सुटका करून घेण्याची गरज आहे.
आपली हीच सवय सोडण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे या खाद्यपदार्थांच्या बाबतीत उदासीन होणं... होय, एका अभ्यासानुसार या पद्धतीच्या आत्मघाती व्यवहारामुळे तुम्हाला आकर्षित करणाऱ्या वस्तूंपासून दूर राहणं शक्य होतं. त्यासाठी तुम्ही त्या वस्तूंप्रती उदासीन होणं गरजेचं आहे.
`युनिव्हर्सिटी ऑफ मियामी`च्या अँथनी सेलेनरो यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा लोक दु:खी असतात तेव्हा ते जंक फूड आणि फास्ट फूड समोर असतानादेखील ते त्याच्याकडे आकर्षित होत नाहीत.
अभ्यासकांनी आपल्या प्रयोगादरम्यान, सहभागींना अगोदर त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांची चित्र दाखवले... त्यानंतर त्यांना एक खूप कंटाळवाणा कार्याभ्यास दिला गेला. त्यानंतर त्यांच्यासमोर अगोदर दाखवण्यात आलेलं भोजन मांडलं गेलं.
यावेळी, अभ्यासकर्त्यांच्या असं लक्षात आलं की, अगोदर लोक खूप उत्साहीत होते... त्यानंतर ते निराश झाले आणि नंतर आपलं आवडतं भोजन समोर असूनही त्यांनी ते खाण्यामध्ये रस दाखवला नाही. `कंज्युमर रिसर्च`मध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.