अमेझॉनचा ‘फायर फोन’ आता ६० रुपयात खरेदी करा

ई कॉमर्स कंपनी अमेझॉनने आपला स्मार्टफोन असलेला ‘फायर फोन’ची किंमत दोन महिन्यानंतर १९८ डॉलरवरून कमी करून ९९ सेंट म्हणजे ६० रुपये केली आहे. कंपनी हा फोन दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांशी करार करून ग्राहकांना विकणार आहे.

Updated: Sep 9, 2014, 08:36 PM IST
अमेझॉनचा ‘फायर फोन’ आता ६० रुपयात खरेदी करा title=

नवी दिल्ली  : ई कॉमर्स कंपनी अमेझॉनने आपला स्मार्टफोन असलेला ‘फायर फोन’ची किंमत दोन महिन्यानंतर १९८ डॉलरवरून कमी करून ९९ सेंट म्हणजे ६० रुपये केली आहे. कंपनी हा फोन दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांशी करार करून ग्राहकांना विकणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ३२ जीबीचा हा फोन आता ९९ सेंटमध्ये दोन वर्षांसाठी उपलब्ध होणार आहे. यात एक वर्षाची प्रिमियम सदस्यता आणि इतर क्लाऊड सेवासह वायरस सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. उल्लेखनीय गोष्ट अशी की ब्रिटन आणि जर्मनीतील ग्राहकांना हा फोन जवळ जवळ फुकट किंवा एक युरोमध्ये मिळणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.