राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित फेसबूकच्या माध्यमातून भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चिरंजीव अमित यांनी आपले अधिकृत फेसबूक पेज तयार केलेय. या फेसबूक पेजच्या माध्यमातून ते व्यंग्यचित्रकार म्हणूनही लोकांसमोर येत आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 7, 2017, 08:30 PM IST
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित फेसबूकच्या माध्यमातून भेटीला title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चिरंजीव अमित यांनी आपले अधिकृत फेसबूक पेज तयार केलेय. या फेसबूक पेजच्या माध्यमातून ते व्यंग्यचित्रकार म्हणूनही लोकांसमोर येत आहे. 

मला माझ्या विचारसरणीचे खूप लोकं भेटत होते. त्यांना त्याचवेळी माझ्या बाबांसमोर विचार मांडायचे होते तसेच 'अमित ठाकरे' म्हणून माझे विचार समजून घ्यायला ते उत्सुक होते. पण इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकांशी संवाद साधायला खूप वेळ लागणार. त्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला Facebook page चा पर्याय वापरतोय, असे ते म्हणालेत.