मुंबई : अॅपलने भारतात आपल्या स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कपात केली असून आयफोन ६ एस आणि आयफोन ६ एस प्लसची किंमत १० नाही, १२ नाही तर तब्बल २२ हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
अॅपलने भारतातील आयफोनच्या किंमती पुढीलप्रमाणे...
आयफोन ६ एसची (१२८ जीबी) किंमत ८२ हजार रुपये इतकी होती त्यात २२ हजारांची कपात करण्यात आल्याने हा स्मार्टफोन आता ६० हजार रुपयांना मिळणार आहे.
आयफोन ६ एस श्रेणीतील जास्त आकाराचा डिस्प्ले असलेला व्हेरियंट आयफोन ६ एस प्लस (१२८ जीबी) आता ७० हजार रुपयांना मिळणार आहे. या फोनचा दरही २२ हजार रुपयांनी कमी करण्यात आला आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला बाजारात दाखल झालेल्या चार इंच डिस्प्लेच्या आयफोन एसईची किंमतही कमी करण्यात आली आहे. ६४ जीबी क्षमतेच्या या फोनची किंमत ४९ हजार रुपये होती. हा फोन आता ४४ हजार रुपयांना मिळणार आहे.
अॅपलचे आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस लवकरच बाजारात येत आहेत. या फोन्सचं प्री-बुकिंग सुरू झालं आहे. ७ ऑक्टोबरला प्रत्यक्ष या फोन्सची विक्रीही सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अॅपलने अन्य फोन्सच्या किंमती कमी करून आधीच आपल्या ग्राहकांना खूश करून टाकले आहे.