...अशाच व्यक्तींना डेट करा!

ज्यांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला वेगळे फंडे वापरावे लागणार नाहीत, अशाच व्यक्तींना डेट करा. 

Updated: Sep 23, 2016, 10:55 AM IST
...अशाच व्यक्तींना डेट करा! title=

मुंबई : ज्यांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला वेगळे फंडे वापरावे लागणार नाहीत, अशाच व्यक्तींना डेट करा. 

- तुम्ही विशिष्ट पद्धतीनंच बोलायला हवं, तुम्ही विशिष्ट पद्धतीनंच वागायला हवं अशी अपेक्षा करणारे किंवा तुमच्या छोट्या छोट्या गंमतीशीर गोष्टींनाही ओशाळवाणं समजणाऱ्या व्यक्तींवर तुम्ही साहजिकच प्रेम करू शकत नाहीत.
 
- अशाच व्यक्तींना डेट करा, ज्या तुम्हाला तुम्ही आहात तसं स्वीकारतात... तुमच्यातला खरेपणा त्यांच्या मनाला भावला असेल. 

- ज्या व्यक्तीसोबत राहून तुम्हाला खोटं बोलावं लागणार नाही, खोटं वागावं लागणार नाही... आणि त्या व्यक्तीलाही तुमच्यासोबत बोलताना, चालताना, वागताना फारसा विचार करावा लागणार नाही. एकमेकांसोबत तुम्ही खूप मनमोकळेपणानं बोलू शकता... वागू शकता... 

- अशाच व्यक्तींना डेट करा ज्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या काही सिक्रेटस गोष्टी लपवून ठेवाव्या लागणार नाहीत. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गंमतीशीर आणि क्रेझी गोष्टींचा तुम्ही त्यांच्यासोबत मनमुराद आनंद घेऊ शकता. 

- अशाच व्यक्तींना डेट करा ज्या व्यक्ती तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात... तुमच्याबद्दल कोणतेही आडाखे-तडाखे न बांधता... तुमच्या आयुष्यात त्यांना न आवडणाऱ्या गोष्टीही असू शकतात, हे त्यांनी जाणून आणि समजून घेतलेलं असतं. 

- अशाच व्यक्तींना डेट करा ज्या तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकवू शकतील किंवा त्या तुमच्याकडून काही नवीन गोष्टी शिकून घ्यायला उत्सुक असतील. 

- अशाच व्यक्तींना डेट करा ज्यांच्या निर्णयावर तुमच्या सोशल स्टेटस, तुमचा जॉब, तुमचा पगार यांबद्दल काहीही फरक पडत नाही.  

- अशाच व्यक्तींना डेट करा ज्यांना इम्प्रेस करण्याची गरज भासत नाही... कारण तुम्ही जसे आहात तसंच ते तुमच्यावर इम्प्रेस झालेले असतात... आणि त्यामुळेच ते तुमच्यावर प्रेम करत असतात... तुमच्यासोबत राहणं त्यांच्या मनाला भावतं.