मुंबई : सोशल वेबसाईट फेसबुक फॉर्मात आहे... आपल्या युझर्ससाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे सतत प्रयत्न करणाऱ्या या कंपनीत काम करण्याची इच्छा कुणाला नसेल...
अनेक जण आज 'फेसबुक'मध्ये काम करण्याचं स्वप्न पाहत आहेत... सिलिकॉन व्हॅली शहराच्या मध्यभागी फेसबुकचं मुख्य कार्यालय स्थित आहे.
महत्त्वाचं म्हणजे, फेसबुकचा सर्वेसर्वा याचा वार्षिक पगार आहे तो केवळ १ डॉलर... पण, असं असंल तरी कंपनीत इतर वरीष्ठ पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं वेतन किती आहे हे समजलं तर अनेकांचे डोळे पांढरे पडतील... चला तर जाणून घेऊयात, फेसबुकमध्ये काम करणाऱ्यांपैकी काही जणांचा वार्षिक पगार किती आहे ते...
१. अभियांत्रिकी व्यवस्थापक: दोन कोटी ३३ लाख ५० हजार रुपये
२. सॉफ्टवेअर अभियंता : १ कोटी ५९ लाख
३. वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता : १ कोटी ९ लाख ७६ हजार रुपये
४. सॉफ्टवेअर अभियंता चौथा : १ कोटी ९१ लाख रुपये
५. उत्पादन व्यवस्थापक : १ कोटी १९ लाख ६५ हजार रुपये
६. डेटा शास्त्रज्ञ : १ कोटी १४ लाख दोन हजार रुपये
७. सॉफ्टवेअर अभियंता : १ दशलक्ष, १ लाख ५८ हजार रुपये
८. तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक : १ दशलक्ष, ७ दशलक्ष ७९ हजार रुपये
९. संशोधन शास्त्रज्ञ : १ दशलक्ष, ६ लाख, २ हजार रुपये
१०. सॉफ्टवेअर अभियंता तिसरा : १ मिलियन, दोन हजार रुपये
११. नेटवर्क अभियंता : ९८ दशलक्ष ३ हजार रुपये
१२. डेटा अभियंता : ९० दशलक्ष १ हजार रूपये
१३. वापरकर्ता इंटरफेस अभियंता : ९० दशलक्ष, ६ हजार रुपये
१४. उत्पादन अभियंता : ८१ लाख, ३६ हजार १५ रुपये
१५. उत्पादन विश्लेषक : ७ लाख ९७ हजार रुपये
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.