मुंबई : आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर आपण पहिल्यांदा 'गूगल गुरू'ला शरण जातो. पण, हा 'गूगल गुरू'ही कधी कधी चुकू शकतो. खरं नाही वाटत ना... मग हे पाहाच...
महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे तर तुम्हाला निश्चितच माहित असेल... त्यांचा चेहराही तुमच्या चांगलाच ओळखीचा असेल... पण, याच प्रश्नाचं उत्तर 'गूगल'ला विचारून पाहा...
'who is the chief minister of maharashtra' असा प्रश्न तुम्ही गूगलवर विचारला तर तुम्हाला हे स्क्रीनवर अशी माहिती मिळेल.
यामध्ये, पहिल्यांदा विकिपिडियावर दिलेली उपलब्ध असलेली माहिती मिळेल. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची माहिती मिळेल पण, फोटो मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा दिसतोय. असो... कारण, गूगलची ही काही पहिलीच चूक नाही.
पण याचमुळे, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनाही उगाचंच जोर आलेला दिसतोय. कारण, गूगलचा याच स्क्रीन शॉटसहीत 'राज्यात सरकार कुणाचंही असो, सरकार चालवतात शरद पवारच' असा मॅसेज व्हॉटसअप आणि सोशल मीडियावर फिरताना दिसतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.