बीजिंग : चीनी ई-कॉमर्स कंपनी असलेली 'अलिबाबा'ची विक्री 3 ट्रिलियन युआन म्हणजेच तीन लाख कोटी युआन 463 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
'अलिबाबा' लवकरच जगातील सर्वांत मोठी रिटेल कंपनी असलेल्या 'वॉलमार्ट' ला विक्री आणि एकूण उलाढालीच्या बाबतीत पिछाडीवर टाकण्याची शक्यता आहे.
'वॉलमार्ट'ने 31 जानेवारी 2016 पर्यंत 478.6 अब्ज डॉलर मूल्याची निव्वळ विक्री केली आहे. तर 'अलिबाबा'ची विक्री तीन लाख कोटी युआन म्हणजेच 463 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. 'अलिबाबा'कडून आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च रोजी विक्रीच्या आकड्याची अधिकृत आकडेवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अलिबाबाचे चीनमधील हंग्झहौ येथे मुख्यालय आहे तर अमेरिकेत बेंटोनविले, आर्कान्सा येथे वॉलमार्टचे मुख्य कार्यालय आहे. 'अलिबाबा'च्या एकूण विक्रीची तुलना केली, तर ती चीनच्या सिचुआन प्रांताच्या निव्वळ देशांतर्गत उत्पादनाच्या जीडीपी बरोबर आहे.