नवी दिल्ली : एकमेकांपर्यंत पोहचण्यासाठी आजकाल सोशल मीडियाचा हाच सर्वोत्तम मार्ग ठरलाय. ज्या पद्धतीनं चांगल्या कामांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो, त्याच पद्धतीनं चुकीच्या कामांसाठीही याचा वापर केला जातो...
असाच एक प्रकार उघडकीस आलाय कुवैतमध्ये... इथं राहणाऱ्या एका व्यक्तीला फेसबुकवर एक फ्रेंडशीप रिक्वेस्ट मिळाली... महिलेनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचं दिसताच या व्यक्तीनं फारसा विचार न करता तात्काळ ही फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली.
लवकरच, या दोघांमध्ये गप्पाही सुरू झाल्या... या गप्पांनी लवकरच फ्लर्टिंगचं स्वरुप घेतलं. हे फ्लर्टिंग इतकं वाढलं की दोघांनीही लवकरच एका हॉटेलमध्ये भेटण्याचा निर्णय घेतला. ठरवल्याप्रमाणे दोघेही हॉटेलमध्येही भेटले... पण, आपल्या फेसबुक प्रेयसीला प्रत्यक्षात पाहिल्यानंतर मात्र हा व्यक्ती पांढराच पडला... कारण, ही फेसबुक प्रेयसी दुसरी तिसरी कुणीही नसून त्याचीच पत्नी होती...
या व्यक्तीच्या पत्नीला तो फेसबुकवरून मुलींना डेटिंग करत असल्याचा संशय होताच... त्यामुळे, तिनं फेसबुकवर एका खोट्या नावानं एक अकाऊंट तयार केलं. आणि आपल्याच पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.
हे प्रकरण आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहचलंय... आता याच महिलेनं याच पुराव्याच्या आधारे पतीशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.