फेसबुक, ट्वीटरच्या व्यसनाने ती झाली 'वेडी'

सोशल साईटसच्या व्यसनाने एका महिलेला मानसिक उपचार घेण्यासाठी अखेर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावरून फेसबुक आणि ट्वीटर हे व्यसन तुम्हाला वेड लावू शकतं, अशी चर्चा आहे.

Updated: Aug 12, 2014, 06:55 PM IST
फेसबुक, ट्वीटरच्या व्यसनाने ती झाली 'वेडी' title=

लंडन : सोशल साईटसच्या व्यसनाने एका महिलेला मानसिक उपचार घेण्यासाठी अखेर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावरून फेसबुक आणि ट्वीटर हे व्यसन तुम्हाला वेड लावू शकतं, अशी चर्चा आहे.

बर्लिनमध्ये एका 31 वर्षीय महिलेला रूग्णालयात दाखल केल्यानंतर, ही ट्वीटर सायकोसीस केस असल्याचं सांगून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

या महिलेने मागील काही दिवसांपासून आपले जास्तच जास्त तास हे वाचन, मेसेज लिहण्यावर घालवले आहेत, तिने आपले सर्व सामाजिक संबंधांकडे दुर्लक्ष केलंय. एवढंच नाही तिचं जेवणंही फारच कमी झालंय आणि झोपही ती कमी घेतेय.

सेलिब्रिटी आणि संस्था यांच्यापर्यंत पोहोचण्याचा ट्वीटर या एक पर्याय आहे, असं तिला वाटतंय, तिच्या अकाऊंटवरील सिम्बाल, फीडवरून हे लक्षात येतंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.