मुंबई : जगभरात आज फादर्स डे साजरा केला जातोय. बाबांचा हात पकडूनच तर तुम्ही हे जग पाहिलंय. अशा या बाबांना फादर्स डेच्या दिवशी ही गिफ्ट देऊन खुश करा.
घड्याळ - या दिवशी तुम्ही तुमच्या बाबांना घ़ड्याळ गिफ्ट म्हणून देऊ शकता.
कॉफी मेकर – तुमच्या बाबांना कॉफी प्यायला आवडत असेल तर तुम्ही त्यांना कॉफी मेकर गिफ्ट करु शकता.
मॉर्डन शेव्हिंग किट – आपले बाबा सलूनमध्ये जाण्याऐवजी घऱीच शेव्हिंग करणे पसंत करतात. अशावेळी तुम्ही त्यांना मॉडर्न शेव्हिंग किट देऊ शकता.
ज्यूसर – वडिलांच्या आरोग्यांच्या दृष्टीने तुम्ही त्यांना ज्यूसर गिफ्ट करु शकता. हे काहीतरी हटके हेल्दी गिफ्ट असेल.
परफ्युम – बाबांना परफ्युमची आवड असेल तर त्यांच्या आवडीचा परफ्युम त्यांना द्या.
संदेश लिहिलेला कॉफी मग – फादर्स डेच्या दिवशी बाबांप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही मेसेज लिहिलेला कॉफी मग त्यांना गिफ्ट करु शकता.