मुंबई: आपल्या फेसबुक टाइमलाइनवर अचानक येणाऱ्या अश्लिल वायरसनं फेसबुक युजर्सना चांगलंच त्रस्त केलंय. या मालवेअरच्या हल्ल्यात अनेकांची मान शरमेनं खाली जातेय.
वायरसच्या एका पीडित फेसबुक युजरनं सांगितलं की, नोटिफिकेशनमध्ये पाहिल्यानंतर कळतं की त्यांना कोणत्या मित्रानं यांना अशा कटेंटमध्ये टॅग केलंय. अजून १५-२० जणांना त्यात टॅग केलेलं असतं. त्यात काय ते दिसत नाही. ती लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला त्यात पॉर्न इमेज आणि पॉर्न व्हिडिओ दिसतो.
कुणी जर त्या लिंकवर क्लिक केलं तर तो वायरस आपल्या फ्रेंड लिस्टमधील काही जणांकडे जातो. ही घटना फेसबुकच्या मेल, फिमेल दोन्ही युजर्ससोबत होतेय. हा वायरस परसल्यानंतर सोशल मीडिया साइट फेसबुकवर आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना स्पष्टीकरण द्यावं लागतंय की, त्यांनी असा काही कंटेंट पाठवला नाही.
उत्तर प्रदेशच्या आग्रा इथं फेसबुकवर या वायरसची ओळख पहिल्यांदा केली गेली. आग्राच्या सायबर क्राइम सेलनुसार वायरस किलिम मालवेअर फॅमिलीतील आहे आणि संपूर्ण जगात या वायरसचा हल्ला होतोय. हा व्हायरस पाठविण्यासाठी शॉर्ट युआरएलचा वापर केला जातोय. व्हायरस पाठविण्यासाठी वेबसाइट (videomasars.healthcare)चा वापर केला जातोय. याद्वारे हॅकर्स डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल फोनपर्यंत व्हायरस पाठवतो.
काय करतो हा व्हायरस?
.exe वाली लिंक ओपन न करण्याचा सल्ला देण्यात येतोय. जर आपल्या कंप्युटरमध्ये मालवेअर आहे तर तो आपलं फेसबुक अकाऊंट च्या इनबॉक्समध्ये जावून अनेक अनोळखी लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतो. तसंच आपलं संपूर्ण अकाऊंट नियंत्रित करूनच आपली महत्त्वाची माहिती गोळा करणं आणि कंप्युटर क्रॅशही करू शकतो.
कसा बचाव कराल या व्हायरसपासून?
# मालवेअरपासून बचाव करण्यासाठी फेसबुकनंही आपल्या हेल्प सेंटरमध्ये युजर्सना सल्ला देणं सुरू केलंय. फेसबुकनुसार जि लिंक शॉकिंग व्हिडिओ असल्याचा दावा करते, स्पेशल ऑफर देण्याचा दावा करते, ब्राउजर डाऊनलोड करतांना अधिक सुविधा देण्याचं आश्वासन देते(आपण पाहा कोणी-कोणी आपलं प्रोफाईल पाहिलंय), अशा लिंकवर क्लिक करू नका.
#फेसबुककडून फ्री असलेलं एफ सिक्युअर स्कॅन, ट्रँड मायक्रो स्कॅन आणि ईसेट स्कॅनसारख्या सुविधेचा वापर करा. या स्कॅनचा वापर करून आपण आपलं कंप्युटर स्कॅन करू शकतो. आपल्या कंप्युटर सिस्टममध्ये इंचरनेट यूज करण्यासाठी वापरले जाणारे ब्राउजर मोझिला फायरफॉक्स, सफारी, गूगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर लगेच अपग्रेड करावं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.