नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला 'मोटो एक्स फोर्स' स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आलाय. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे चार वर्षांपर्यंत या स्मार्टफोनचा डिस्प्ले तुटणार नाही. आठ फेब्रुवारीपासून हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर उपलब्ध होणार आहे.
३२ आणि ६४ जीबीमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. ३२जीबीच्या स्मार्टफोनची किंमत ४९ हजार ९९९ रुपये तर ६४ जीबीची किंमत ५३ हजार ९९९ रुपये आहे. २ टेराबाईटपर्यंत मेमरी वाढवण्याची क्षमता आहे.
या स्मार्टफोनचा डिस्प्ले ५.४ इंचाचा असून तो शटरप्रूफ टेक्निकने बनवण्यात आला. याच अॅल्युमिनियम रिजीड कोर, एमोलेड स्क्रीन आणि दोन लेयरवाला टचस्क्रीन पॅनल आहे.
यात २ गिगाहर्टझ क्वालम स्नॅपड्रॅगन ८१० ऑक्टा-कोर चिपसेट आहे. तीन जीबी रॅम आहे. यात रेयर कॅमेरा २१ मेगापिक्सेल तर फ्रंट कॅमेरा पाच मेगापिक्सेल विथ फ्लॅश देण्यात आलाय. याची बॅटरी क्षमता 3760mAh इतकी आहे.