मुंबई: मुंबईत लोकलनं प्रवास करणाऱ्यांना खुशखबर.. आता तिकीटांसाठी लांबचलांब रांगा लावायला नकोत. तुम्ही मोबाईवरच तिकिटं विकत घेऊ शकाल आणि त्याची प्रिंटही काढू शकाल.
स्मार्ट तसंच इंटरनेट सुविधा नसलेल्या फोनवरुनही तुम्ही तिकिट विकत घेऊ शकाल. येत्या तीन महिन्यात रेल्वे ही सुविधा सुरु करणार आहे. सध्या तिकीट खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. त्यावर उपाय म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत ही नवी सुविधा रेल्वे प्रशासन सुरु करणार आहे.
इंटरनेट कनेक्शन असलेला स्मार्ट फोन तसंच साध्या फोनवरुनही आता लोकल तिकीट खरेदी करता येणार आहे.
कसे मिळेल मोबाईलवर तिकीट?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.