'फेसबूक'वरील 'कॅन्डी क्रश' रिक्वेस्टपासून आता होणार सुटका

फेसबूकवर मिळणाऱ्या गेम रिक्वेस्टनं त्रस्त झालेल्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता फेसबूक यूजर्स अशाप्रकारच्या रिक्वेस्ट आणि रिमायंडरला ब्लॉक करू शकतात. फेसबूकनं सुरू केलेली ही सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त काही बटनं दाबावी लागणार आहेत. 

Updated: May 10, 2015, 12:02 PM IST
'फेसबूक'वरील 'कॅन्डी क्रश' रिक्वेस्टपासून आता होणार सुटका title=

मुंबई: फेसबूकवर मिळणाऱ्या गेम रिक्वेस्टनं त्रस्त झालेल्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता फेसबूक यूजर्स अशाप्रकारच्या रिक्वेस्ट आणि रिमायंडरला ब्लॉक करू शकतात. फेसबूकनं सुरू केलेली ही सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त काही बटनं दाबावी लागणार आहेत. 

फेसबूक यूजर्सच्या सर्वाधिक तक्रारी गेम आणि अॅपसाठी मिळणाऱ्या मेसेजेसबाबत असतात. मात्र यातून तुम्ही मुक्ती मिळवू शकता. यासाठी फेसबूक अकाउंट सेटिंग मधील 'ब्लॉकिंग' पर्याय निवडा.

त्यामध्ये 'ब्लॉक अॅप इनवाईट्स' हा पर्याय मिळेल. त्यामध्ये तुम्ही त्या व्यक्ती अथवा मित्राचं नाव टाईप करा, ज्याद्वारे मिळणाऱ्या रिक्वेस्टमुळे तुम्ही त्रस्त झाले आहात. त्यानंतर तो व्यक्ती अथवा मित्र तुम्हाला कोणतीही रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही. 

या सेटिंगचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही अॅपला कायमस्वरूपी ब्लॉक करू शकता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.