...हा ठरलाय जगातला सर्वात घाणेरडा सेल्फी!

एक 'सेल्फी' सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालतोय... या सेल्फीमध्ये मुलगा एका प्रेतासमोर उभा राहून स्वत:चा फोटो काढताना दिसतोय. असंवेदनशील असा हा सेल्फी याच कारणामुळे सोशल वेबसाईटवर टीकेचा विषय ठरतोय. 

Updated: Mar 11, 2015, 11:36 AM IST

मुंबई : एक 'सेल्फी' सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालतोय... या सेल्फीमध्ये मुलगा एका प्रेतासमोर उभा राहून स्वत:चा फोटो काढताना दिसतोय. असंवेदनशील असा हा सेल्फी याच कारणामुळे सोशल वेबसाईटवर टीकेचा विषय ठरतोय. 

हा फोटो @iShewaani या अकाऊंटवरून शेअर केला गेलाय. 'हा मुलगा आपल्या पित्याच्या प्रेतासमोर उभा राहून फोटो काढतोय... सेल्फी काढण्याची क्रेझ एका वेगळ्याच थराला पोहचलीय' असं या फोटोखाली म्हटलं गेलंय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.