तीन गोष्टी प्रत्येकासाठी महत्वाच्या

जीवनात यशस्वी होण्यासाठी काही गुण आपल्या अंगी बाळगावे लागतात. ज्या ठिकाणी सर्वोत्तम मिळेल तेथे जाऊन ते प्राप्त करण्याची उमेद सर्वांनीच बाळगली. कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असावी. तसेच काही मूलमंत्र आहेत जे पाळल्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो

Updated: Dec 12, 2015, 05:07 PM IST
तीन गोष्टी प्रत्येकासाठी महत्वाच्या title=

मुंबई : जीवनात यशस्वी होण्यासाठी काही गुण आपल्या अंगी बाळगावे लागतात. ज्या ठिकाणी सर्वोत्तम मिळेल तेथे जाऊन ते प्राप्त करण्याची उमेद सर्वांनीच बाळगली. कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असावी. तसेच काही मूलमंत्र आहेत जे पाळल्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो

या तीन गोष्टी आहेत महत्त्वाच्या

तीन व्यक्तींचा मान राखा - आई, वडिल, गुरु
तिघांपासून सावध राहा - चोरी, निंदा, असत्य
तिघांना ताब्यात ठेवा - जीभ, मिजास, क्रोध
तिघांची चेष्टा करु नका - अपंग, वेडा, वृद्ध
तिघांना जवळ ठेवा - नम्रता, आदर, धैर्य
तीन गोष्टी स्वाधीन ठेवा - राग, जीभ, इच्छा
तीन गोष्टींसाठी भांडा - अब्रू, देश, मित्र
तीन गोष्टींचा तिरस्कार करा - निर्दयता, गर्व, कृतघ्नता
तीन गोष्टी विसरु नका - कर्ज, कर्तव्य, मर्जी
तीन गोष्टींपासून स्वत:ला वाचवा- वाईट सवय, स्वार्थ, निंदा
तीन गोष्टींना सांभाळा - धर्म, धन, अश्रू
तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा - मेहनत, विद्या, ईश्वर
तीन गोष्टी मिळतात पण परत येत नाहीत - आई, वडील, तारुण्य
तीन गोष्टी अंगी बाणा - शहाणपणा, चांगुलपणा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.