नवी दिल्ली : फेसबुक ही सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय साईट आहे. दिवसेंदिवस फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. फेसबुक युजर्स अधिक वाढवण्याच्या दृष्टीने फेसबुकने मोबाईल अॅपमध्ये नवे अपडेट आणले आहे.
आता ऑफलाईन असतानाही तुम्ही फेसबुक वापरु शकणार आहात. ऑफलाईन असतानाही तुम्ही फेसबुकवर पोस्ट आणि कमेंट करु शकणार आहात. फेसबुक लवकरच त्यांच्या न्यूज फीड फीचरमध्ये बदल करणार आहे.
फेसबुकच्या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये लवकरच हे अपडेट येणार आहे. एखाद्यावेळी इंटरनेटचा स्पीड कमी असेल अथवा इंटरनेट सुरु नसेल तरीही तुम्ही पोस्ट आणि कमेंट करु शकणार आहात. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही इंटरनेट सुरु कराल तेव्हा या सर्व पोस्ट आणि कमेंट ऑनलाईन जातील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.