मुंबई: आज जिथं सगळीकडे महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या बातम्या येतायेत. तिथं तिनं त्रास देणाऱ्या पुरुषाला WWE स्टाईल चोप दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय.
यात रेल्वे स्टेशनवर एक सडपातळ महिला दिसतेय... जिच्यासोबत एक पुरुष वाद घालतांना दिसतोय. सुरूवातीला वाद झाल्यानंतर ती जायला लागते. पण पुरूषानं तिची पर्स खेचल्यानंतर तिनं जी काही आपली WWE स्टाईल दाखवलीय. ती पाहून आपण थक्क व्हाल.
आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय. पण ती महिला आहे की तृतीयपंथी हे यावरून स्पष्ट होत नाहीय, असं असलं तरी महिलांवरील वाढते अत्याचार बघता सर्वच महिलांनी स्वरक्षणसाठी अशाप्रकारे कराटे शिकण्याची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.