मुंबई : व्हॉट्सअपवर भारतीय दिवसाला ५ कोटी मिनिटं फुकटं घालवत असल्याची धक्कादायक आकडेवारी आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी व्हॉट्सअपनेच प्रसिद्ध केली आहे.
सहा महिन्यांपूर्वी व्हॉट्सअपने व्हीडीओ कॉलिंग सुविधा सुरू केली. त्यानंतर जगभरात ३४ कोटी मिनिटं या अॅप्लिकेशनवर घालवण्यात आली.
त्यातील जवळपास ५ कोटी तास एकट्या भारतात खर्च झालेत. भारतात एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा प्रचंड फायदा व्हॉट्सअपलाही झाला आहे.