नवी दिल्ली: भारतात व्हॉट्स अॅपच्या सक्रीय युजर्सची संख्या वाढून सात कोटींच्या वर पोहोचली आहे. ही संख्या व्हॉट्स अॅपच्या एकूण युजर्सच्या १० टक्क्यांहून अधिक आहे. व्हॉट्य अॅपचे भारतातील बिझनेज प्रमुख नीरज अरोडा यांनी दिलीय.
व्हॉट्स अॅपचे उपाध्यक्ष अरोडा यांनी मुंबईत पाचव्या आयएनके संमेलनात सांगितलं, ‘’इथं आमचे सात कोटींहून अधिक सक्रीय युजर्स आहे जे कमीत कमी महिन्यातून एकदा त्याचा वापर करतात”. त्यांनी सांगितलं की, कंपनीचे एकूण युजर्सची संख्या ६० कोटी आहे. व्हॉट्स अॅपला याच वर्षी १९ अब्ज डॉलर या किमतीत फेसबुकनं विकत घेतलंय.
त्यांनी सांगितलं भारत व्हॉट्स अॅपसाठी त्यांची सर्वात मोठी बाजारपेठमधली एक आहे आणि कंपनीचं लक्ष्य भारत आणि ब्राझिलसारख्या बाजारपेठेतून अब्जावधी लोकांना जोडणं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.