पुरुषांना इच्छा ‘डेट’वर महिलांनी खर्च करण्याची

डेटवर गेलात, पैसे कुणी भरले... पैसे कुणी भरावे हा काही नियम नाही. पण नेहमीच पुरुष पैसे भरतांना दिसतात. मात्र आता जवळपास ६४ टक्के पुरुषांना वाटतं की, आपण डेटवर गेलो असता आपल्या सोबत असलेल्या महिलेनं पैसे भरावेत. तर स्त्रियांकडून पैसे घेणं योग्य नाही, असं वाटणाऱ्यांची संख्याही काही कमी नाहीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 11, 2013, 07:58 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, न्यूयॉर्क
डेटवर गेलात, पैसे कुणी भरले... पैसे कुणी भरावे हा काही नियम नाही. पण नेहमीच पुरुष पैसे भरतांना दिसतात. मात्र आता जवळपास ६४ टक्के पुरुषांना वाटतं की, आपण डेटवर गेलो असता आपल्या सोबत असलेल्या महिलेनं पैसे भरावेत. तर स्त्रियांकडून पैसे घेणं योग्य नाही, असं वाटणाऱ्यांची संख्याही काही कमी नाहीय.
एका अभ्यासानुसार असं दिसून आलं कि, अनेक पुरुषांना असं वाटतं डेटवर गेले असता येणारा अर्धा खर्च महिलांनी करावा. तर ज्या महिला बिल्कुल खर्च करत नाहीत अशांसोबत डेटवर जाणं आवडणार नसल्याचं ४४ टक्के पुरुषांचं मत आहे.
आम्ही पैसे भरण्याची ऑफर करतो असं जवळपास ५७ टक्के महिलांनी स्पष्ट केलंय. मात्र ३९ टक्के महिलांना असं वाटतं कि आपण केलेली पैसे भरण्याची ऑफर पुरुषांनी नाकारावी. डेटवर महिलांकडून पैसे भरण्याची पुरुष अपेक्षा करुच कसं शकतो, असं ४४ टक्के महिलांचं म्हणणं आहे.

चैपमेन विद्यापीठाच्या डेव्हिड फ्रेडरिक, कॅलिफोर्निया स्टेट विद्यापीठ आणि वेलसली कॉलेजच्या त्यांच्या सहकार्यांनी हा अभ्यास केला. यात १७ हजार सहभागी पुरुष-स्त्रियांवर हा अभ्यास करण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.