प्रशांत जाधव, संपादक, 24taas.com
तुम्हांला खूप घाई आहे आणि त्यावेळेस टॅक्सी करण्यावाचून पर्याय नसतो. अशा वेळी कोणताही टॅक्सी चालक जवळच असलेल्या ठिकाणी यायला तयार नसतो. तेव्हा हाताश होऊन वेळप्रसंगी न थांबणाऱ्या टॅक्सी चालकाला शिव्या शाप देऊन आपण वाट पाहतो किंवा बसने जाण्याचा पर्याय शोधतो. पण तुम्हांला माहित आहे का टॅक्सी चालकाने भाडे नाकारले आणि त्याची तक्रार आपण पोलिस स्टेशनमध्ये केली तर त्याचं लायसन्सही रद्द होऊ शकतो.
आज सायंकाळी कटिंग चहा मारण्यासाठी ऑफिसच्या खाली उतरलो. त्यावेळी एक महिला रिकाम्या येणाऱ्या टॅक्सीला थांबून इच्छित स्थळी जाण्यासाठी विचारत होती. पण ८ ते १० टॅक्सी थांबल्या पण तिला एकानेही टॅक्सीमध्ये घेतलं नाही. बहुदा त्या महिलेला दादर किंवा जवळच कुठे जायचं होतं. ती महिला हैराण झाली. तिची अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिने वैतागून पोलिसांच्या १०० क्रमांकाला फोन केला. काही क्षणात या टू व्हिलरवर गस्त घालणारे दोन पोलिस कमला मिल कंपाउंडच्या गेटवर आलेत. त्यांना तिने हकिकत सांगितली.
त्या पोलिसांनी महिलेला मदत करण्याची तयारी दर्शविली. त्याचवेळी एक रिकामी टॅक्सी त्या दिशेने येताना एका पोलिसाला दिसली. त्याने बाईकवरून उतरून ती टॅक्सी थांबविण्याच प्रयत्न केला. खाकी वर्दीतल्या या पोलिसाला त्या टॅक्सी चालकाने पाहिले न पाहिल्यासारखे केले आणि चक्क कट मारून तो सुसाट वेगाने पुढे गेला. मग त्या खाकीतल्या सिंघमचे पित्त खवळले त्याने आपल्या बाईकला किक मारली आणि त्या भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅक्सी चालकाचा पाठलाग केला. हा पाठलाग झी ऑफिसपासून दूरदर्शनपर्यंत सुरू होता. अखेर त्या सिंघमने त्या टॅक्सी चालकाला गाठले. त्या ठिकाणी टॅक्सी चालकाचा ‘भ’कार आणि ‘म’कारावरून उद्धार केला असेल कोण जाणे. पण काही काळातच त्याला पुन्हा झीच्या ऑफिस खाली तो सिंघम घेऊन आला. या वेळी त्याने गाडीचा नंबर घेतला, महिलेचा नंबर घेतला.
पोलिसांनी महिलेला तक्रार करण्यास सांगितले, तक्रार केल्याशिवाय अशा मुजोर टॅक्सी चालकांवर कारवाई होणार नाही, असे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. पण येथेच सामान्यांची सामान्य कचखाऊ वृत्ती दिसून आली. मला वेळ होत आहे. मला घरी जायचं आहे, मी आता निघते. त्यावेळी धावपळ करून घामाघूम झालेल्या पोलिसाचा चेहरा पाहण्यासारखा होता. त्याने हे प्रयत्न त्या महिलेला मदत करण्यासाठी केले होते आणि मुजोर टॅक्सी चालकांना धडा दाखविण्यासाठी होते. पण त्याचे प्रयत्न पूर्ण फळाला आले नाही. त्या महिलेला मदत झाली पण टॅक्सी चालक बिदिक्तपणे पुन्हा आपल्या तोऱ्यात निघून गेला.
यावेळी माझ्या सोबत प्रोमो एडिटर शौकत आणि मेकअप मेनचे हेड अरूण गुजर होते. आम्ही पोलिसांशी बोलत होतो. त्यावेळी हाताश झालेल्या पोलिसांनी सांगितले की, आम्ही काय करणार.... लोक तक्रार करत नाही. आपल्या नाही पडायचं या लफड्यात अशी भावना त्यांची असते. त्यामुळे हे सुटून जातात. लोकाच्या कटखाऊ वृत्तीमुळे या माज आलेल्या टॅक्सी चालकाना आम्ही काहीच करू शकत नाही. जागृक नागरिकांनी अशा विरूद्ध तक्रार केली तर आम्ही काही कारवाई करू शकतो. पण १०० पैकी ९९ प्रकरणात नागरिक तक्रार करत नाही. तक्रार केली तर अशा मुजोर टॅक्सी चालकाचा परवानाही रद्द होऊ शकतो.
आम्ही चर्चा करीत ऑफिसमध्ये येत होतो. त्यावेळी काही प्रश्न मनात घोळत होते. हे असं का होतं. पोलिसांना १०० क्रमांकावर फोन करून पोलिस तात्काळ येऊ शकतात. तर पोलिसांना त्याच ठिकाणी तक्रार नोंदविण्याची सोपी पद्धत का उपलब्ध नाही. महिलेने त्यावेळी जो काळ रस्त्यावर घालविला, त्याच वेळात तिची तक्रार नोंदविण्याची एका सोपी पद्धत असायला हवी होती. नवीन तंत्रज्ञानाने पोलिस खात्यालाही अपग्रेड केले तर ही तक्रार तिथल्या तिथे नोंदविता आली असती.
दुसरं म्हणजे असे की, यावेळी पोलिसांनीही त्या टॅक्सी चालकावर कारवाई करण्यास काहीच हरकत नव्हती. या सर्व प्रसंगात टॅक्सी चालकाने पोलिसाला न जुमानता भरधाव वेगाने टॅक्सी चालवली होती. त्याचे आम्ही साक्षीदार होतो. त्यामुळे पोलिसांनी सुमोटो कारवाई करायला हवी होती, असे वाटते. असो पण अजून तांत्रिक दृष्ट्या पोलिसांना सक्षम करण्यात काही काळ जावा लागेल. तो पर्यंत नागरिकांनी आपली जबाब