‘बंधुत्व’ आणि ‘मित्रत्व’

प्रसाद घाणेकर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं तमाम मराठी मनांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या एका हृदयाने ते काही काळासाठी का होईना पण केलं. मीडियावाल्यांनी अनेक शक्यतांच्या फटाक्यांची आतषबाजी करत चर्चेला तोंड फोडलं. मग पिंपळपारावरील बैठक तरी कशी मागे राहील. पिंपळपारावरच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटू लागले. आणि त्यांनी विषय निवडला ‘हे मित्रत्व आणि हे बंधुत्व’.

Updated: Jul 22, 2012, 04:39 PM IST

प्रसाद घाणेकर, 

www.24taas.com

 

 

प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं. अक्षम्य चुका क्षम्य असतात. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपतीपदाच्या निवडीचा वाद सुरू आहे. या वादात राजकीय पक्षांनी आपले रंग दाखविले. एवढेच नव्हे तर संगमांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. पण अशा या पेचात सरस ठरली ती मैत्री. राजकीय पटलावरचे सम्राट शरद पवार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची निखल मैत्री आणि त्यांचं मित्रत्व कामाला आलं. तर उद्धव ठाकरेंना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर राज यांचं राजकारणापलीकडचे बंधुप्रेम उफाळून आलं. राजकारणापलीकडचं बंधुत्वाचं नातं ख-या अर्थाने महत्त्वाचं असतं हे त्यांनी दाखवून दिलं.

 

ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं तमाम मराठी मनांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या एका हृदयाने ते काही काळासाठी का होईना पण केलं. मीडियावाल्यांनी अनेक शक्यतांच्या फटाक्यांची आतषबाजी करत चर्चेला तोंड फोडलं. मग पिंपळपारावरील बैठक तरी कशी मागे राहील. पिंपळपारावरच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटू लागले. आणि त्यांनी विषय निवडला ‘हे मित्रत्व आणि हे बंधुत्व’.

 

 

 ‘आज ख-या अर्थाने बंधुभाव जागृत झाला. माझ्यासह अनेकांना त्याचा आनंद झाला. भावाने भावाची भेट घेणं यातच सर्व आलं,’ राजा संपादके संपादकीय लिहिण्याच्या ढंगात बोलले. संपादकेंचं बोलणं थांबतं न थांबतं तोच नेहा नटवे केसांच्या पिसा-यात हात घालत म्हणाली, ‘अय्या मला तर आज रामायण आठवलं...म्हणजे राम वनवासात असतानाची त्यातील राम आणि भरत यांची भेट आठवली आणि....’ ‘नटवे काय बोलतेस काय, उद्धव काय वनवासात होते?, अगं त्यांना बरं नव्हतं म्हणून भेटले.’ दादा समाजे नटवेला समजावत म्हणाले.‘सॉरी सॉरी हं. त्याचं काय झालं त्यांचं बंधुप्रेमाच्या बातम्या आत्मतिडकीने देताना मी जरा हेलावूनच गेल. काय सांगू, त्यांच्यातील प्रेम सांगताना मला जरा प्रेमाचं भरतंच आलं होत.‘ नटवे बोलली.

‘येईल, तुला ना भरतं काय प्रेम ओसंडून वाहेल. नशीब मगाशी महाभारत आठवलं म्हणून म्हटलं नाहीस.’ सत्या परखडे नटवेकडे तिरक्या नजरेनं पाहात म्हणाले.

 

‘नटवेनं म्हणे बंधुप्रेम चावून चावून चघळले सकाळपासून संध्याकाळपर्यंत’, संपादकेंनी परखडेंकडे कटाक्ष टाकत नेटवेला टोला हाणला. पण गप्प बसेल ती नेहा नटवे कसली. तिने लगेच राजा संपादकेंना उत्तर देऊन टाकलं, ‘आम्ही चावून चावून चघळले आता तुम्ही लिहून लिहून छापा.’

 

संपादके आणि नटवे यांच्यातील वाद वाढणार नाही याची काळजी जागृत विचारेंनी घेतली. ‘तुम्ही दोघंही वाद थांबवा. पण राज ठाकरेंनी आज जे बंधुप्रेम दाखवलं ते योग्यच होतं. भाऊ भावाच्या पाठिशी उभा राहणार नाही तर कोण राहणार? शेवटी त्यांच्यातील रक्ताचं नातंच पुढे आलं. राजकीय वाद असताना असा दिलदारपणा दाखवणं यासाठी मोठं काळीज लागतं. राजकारणापेक्षा कुटुंबही महत्त्वाचं असतं.’

 

‘एकदम बरोबर बोललात, समाजे’, आज जरा शांत असलेले परखडे बोलले. संपादके आणि नटवे यांच्यातील वाद वाढला असता तर नटवेंनी महाभारतातील कृष्ण-अर्जुनचं उदाहरण दिलं असतं. आणि कृष्णाने जसं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं तसं म्हणे राजने उद्धव ठाकरेंच्या गाडीचं केलं. या नेहा नटवेचा काय नेम नाही.’

‘मग काय तुमच्यावर नेम लावू’ नटवे जरा जोशातच बोलली. त्याबरोबर चर्चेत हशा पिकला.

 

‘राजनी जसं बंधुत्वाचं नातं दाखलवं तस सर्व राजकारण्यानी दाखवलं पाहिजे. फक्त राजकारण एके राजकारण करून चालणार नाही. समाजाप्रती, कुटुंबाप्रती काही आपली जबाबदारी आहे याची जाणीव सर्व राजकारणी मंडळींना व्हायला हवी. स्वत:च्या विकासाबरोबर समाजाचा विकास करताना असा बंधुभाव दाखवला पाहिजे’, दादा समाजेंच्या शब्दांतून प्रेमाबरोबर समाजसेवाही सांडत होती.

 

‘पण काहीही म्हणा आठवड्