सलमानला कशाचा होतोय त्रास?

बॉलिवूडचा वॉन्टेड ऍक्टर सनमानला त्याच्या जुन्याच दुखण्यांनी त्रस्त केलं आहे. सध्या सगळ्यात जास्त बिझी असेलल्या सलमाननं विश्रांती नं घेतल्यानंच त्यांच्या दुखण्यानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. सलमान जे बोलतो ते करूनच दाखवतो.

Updated: Mar 4, 2012, 11:54 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बॉलिवूडचा वॉन्टेड ऍक्टर सनमानला त्याच्या जुन्याच दुखण्यांनी त्रस्त केलं आहे. सध्या सगळ्यात जास्त बिझी असेलल्या सलमाननं विश्रांती नं घेतल्यानंच त्यांच्या दुखण्यानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. सलमान जे बोलतो ते करूनच दाखवतो. मात्र सलमानचा हाच स्वभाव आता त्याच्या गळ्याशी येणार असंच दिसतं आहे. कारण TRIGEMINAL NEURALAGIA या दुखापतीने त्रस्त असलेल्या सलमानवर २०११मध्ये छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

 

खरंतर या शस्त्रक्रियेनंतर सलमानला विश्रांतीची गरज होती मात्र आपल्या कामाशी सलमान नेहमीच कमिटेड राहिलाय त्यामुळेच या शस्त्रक्रियेनंतर सलमानने 'एक था टायगर' या सिनेमाचं शूटिंग सुरू केलं. या सिनेमाचं शूटिंग सलमान खूपच एन्जॉय करत होता मात्र अचानक या सिनेमाच्या सेटवरचं वातावरण चिंतेत बदललं आहे. आणि ही चिंता आहे ती सलमान खानच्या प्रकृतीविषयी.

 

कारण सलमानच्या दुखापतीने पुन्हा आपलं डोकं वर काढलं आहे एक था टायगरमध्ये सलमानचे अनेक स्टंट्स सीन आहेत त्यामुळेच सलमानला पुन्हा या दुखापतीचा सामना करावा लागतो आहे असंही बोललं जातं आहे. शस्त्रक्रियेनंतरही ही दुखापत पुन्हा उद्धवू शकते असं जाणकारांचं म्हणणं आहे जर योग्य ती काळजी घेतली नाही तर दोन वर्ष किंवा कधी कधी दोन महिन्यात हा त्रास पुन्हा जाणवू शकतो आणि सध्या सलमान खानच्या बाबतीतही हेच दिसून येतं आबे. SO सलमान JUST GET WELL SOON.