नौदलाच्या ताफ्यात येत्या दोन वर्षात ८० नव्या युध्दा नौका दाखल होणार आहेत. या ताफ्यात विमानवाहू तसंच अणवस्त्र सज्ज पाणबुड्यांचा देखील समावेश आहे. नौदलाच्या युध्द नौकांच्या ताफ्याचे सरासरी वय या नव्या युध्द नौकांच्या समावेशामुळे कमी होणार असल्याचं नौदलाचे प्रवक्ते कमांडर पी.व्ही.एस.सतीश यांनी सांगितलं. सध्या नौदल ताफ्याचं सरासरी वयोमान १२ ते १५ वर्षे असून पुढच्या वेळेस जेंव्हा राष्ट्रपती आढावा घेण्यासाठी येतील तेंव्हा ते तीन ते चार वर्षांनी तरुन झालेलं असेल.
राष्ट्रपतींनी नौदलाच्या सज्जतेचा आढावा घेतला आणि ८१ युध्द नौका तसंच चार पाणबुड्या आणि नौदल तसंच सीमा सुरक्षा दलाच्या ४४ विमानांकडून सलामीचा स्वीकार केला. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी विक्रमादित्य या विमानवाहू युध्द नौकेचा लवकरच ताफ्यात होणारा समावेश तसंच पाणबुड्या आणि विमनांच्या संख्येने प्रभावित झाल्या. भारताने युध्द नौकांच्या बांधणीत सामर्थ्याचे दर्शन घडवलं असल्याचं त्या म्हणाल्या.