राहुल, अडवाणी, मोदी दहशतवाद्यांचे 'टार्गेट'

काँग्रेसचे राहुल गांधी, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, पंजाबचे मुख्यमंत्री बादल हे दहशतवाद्याच्या निशाण्यावर आहेत.

Updated: Nov 3, 2011, 08:24 AM IST

झी २४ तास मेब टीम, नवी दिल्ली

 

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखवीरसिंह बादल हे दहशतवाद्याच्या निशाण्यावर आहेत.

 

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्यावेळी दहशतवाद्याकडून राहुल गांधी, लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, प्रकाशसिंह बादल, सुखवीरसिंह बादल हे टार्गेट होऊ शकतात, असा इशारा गुप्तचर विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आला आहे.  राजकीय नेते निवडणूक पदयात्रा  काढतील अथवा सहभागी होतील, त्यावेळी हल्ला होऊ शकतो.  बब्बर खालसा आणि लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून हा धोका आहे.

 

बब्बर खालसा आणि लश्कर-ए-तोयबा या दहशवादी संघटनेचे काही सदस्य उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. ते वेगवेगळ्या भागात सक्रीय आहेत. ते स्फोट घडवून घातपात करू शकतात, अशी माहिती गुप्तचर विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.