राहुल गांधी हत्तीला काबूत आणणार का?

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ राहुल गांधी सोमवारी करणार आहेत. बहुजन समाज पार्टीच्या सर्वसर्वा आणि मुख्यमंत्री मायावतींशी वाढत्या संघर्षाची सुरवातच या प्रचार मोहिमेने होणार आहे.

Updated: Nov 13, 2011, 05:35 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ राहुल गांधी सोमवारी करणार आहेत. बहुजन समाज पार्टीच्या सर्वसर्वा आणि मुख्यमंत्री मायावतींशी वाढत्या संघर्षाची सुरवातच या प्रचार मोहिमेने होणार आहे.  मायावतींच्या गैरकारभारावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसचा चेहरा असलेले राहुल गांधी उठो, जागो, बढो असा संदेश फूलपूर इथे एका रॅलीत देण्याची शक्यता आहे. फूलपूर अलाहाबादपासून ३० किलोमिटर अंतरावर आहे.

 

देशात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत फूलपूर हा जवाहरलाल नेहरुंचा मतदारसंघ होता. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या पोस्टर्स आणि बॅनर्सच्या माध्यमातून राहुल गांधी हे काँग्रेसचे भविष्यातील नेतृत्व असल्याचा संदेश मतदारांपर्यंत पोहचवण्यात येत आहे. उत्तर प्रदेशला प्रगती पथावर नेण्यासाठी फक्त काँग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचंही प्रचार मोहिमेतून प्रभावी रित्या ठसवण्यात येत आहे. जवाब हम देंगे ही पक्षाची घोषणाच सर्व काही सांगून जाते. आता याला मायावती कशा जवाब देतात ते पाहायचं.