शिवसेनेचा लोकपालला विरोध – मनोहर जोशी

लोकपाल विधेयकांने समांतर सत्ताधिकारण निर्माण होऊन हा देशासाठी धोका असल्याचं मत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार मनोहर जोशी यांनी आज लोकपालावरील चर्चेच्या वेळी बोलताना सांगितले.

Updated: Dec 29, 2011, 06:34 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

लोकपाल विधेयकांने समांतर सत्ताधिकारण निर्माण होऊन हा देशासाठी धोका असल्याचं मत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार मनोहर जोशी यांनी आज लोकपालावरील चर्चेच्या वेळी बोलताना सांगितले.

 

 

अशा प्रकारची समांतर व्यवस्था निर्माण केल्याने काही प्रमाणात भ्रष्टाचार दूर होऊ शकतो. पण लोकपालमुळे भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट होणार नाही. भ्रष्टाचार दूर करण्यासाठी मूल्यशिक्षणाची आणि देशाभिमान शिकवण्याची गरज आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासून भ्रष्टाचार मुक्त विचारांची पेरणी करणे गरजेचे असल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले.

 

पंतप्रधानांना लोकपालच्या कक्षेत समाविष्ट करण्यात येऊ नये, असे शिवसेनेचे स्पष्ट मत आहे. न्यायपालिकाही याच्या कक्षेत नको, तसेच लोकपालला संसदीय कारवाईनंतर काढता आले पाहिजे.  लोकपाल तयार करताना संसदेचे अधिकार बाधित ठेवायला पाहिजे. या बिलाची अमंलबजावणी झाल्यावर संसद हे सर्वोच्च स्थानी राहणार नसल्याचाही धोका जोशी यांनी व्यक्त केला.

 

शिवसेनेचा काही अटींवर लोकायुक्तांना पाठिंबा आहे. राज्य सरकारांवर लोकायुक्तांसाठी जबरदस्ती नको, लोकायुक्त मुख्यमंत्र्यांनीच नेमला पाहिजे, असे मत जोशी यांनी व्यक्त केले.