उद्धव ठाकरेंनी दखल घेत मातोश्रीवर बोलावून पदाधिका-यांची झाडाझाडती घेतील. आता शिवसेना नाशिकच्या शिवसेनेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अंतर्गत कलहाची कार्याध्यक्ष नेते संवादाची कमतरता होती, वाद नव्हता, असे सांगत असले तरी धुसफूस कायम राहण्याचीच शक्यता अधिक आहे.
गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या मदतीनं नाशिक महापालिकेवर भगवा फडकवणा-या शिवसेनेला अंतर्गत गटबाजीनं पोखरुन टाकलंय. सभागृह नेते आणि महापौर यांच्यात वादाच्या अनेक ठिणग्या पडल्यात. खत प्रकल्पाचे खाजगीकरण आणि भूखंड भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयामुळं तर शिवसेनेत उभी फूट पडली.
शिवसेनेचे महापालिकेतील पदाधिकारीच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या सर्वांना मातोश्रीवर बोलवून त्यांची कानउघाडणी केली आणि निवडणुकीच्या तोंडावर एकोप्यानं राहण्याचा आदेश दिला.
मनसेची निवडणूक तयारी आणि नाशिकच्या राजकारणावर भुजबळांचा वाढता प्रभाव पाहता सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान शिवसेनेसमोर आहे. त्यामुळं अशी गटबाजी शिवसेनेला रसातळाला नेवू शकते. आदेश पाळणारा पक्ष अशी ओळख असणा-या शिवसेनेत अंतर्गत गटबाजीनं डोकं वर काढलं असून आधी एकोपा आणि नंतर महापालिकेतील सत्ता टिकविण्याचं शिवधनुष्य शिवसेनेला उचलावं लागणार आहे.