ज्ञानोबा-तुकोबा पुण्यात दाखल

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात दाखल झालीये. पुणेकरांनी मोठ्या उत्साहानं या दोन्ही पालख्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी, आदरातिथ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुणेकर बाहेर पडले होते. रात्रभर भजन,किर्तनाने पुण्यनगरीत विठुरायाचा जयघोष झाला.

Updated: Jun 14, 2012, 10:25 AM IST

www.24taas.com, पुणे 

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात दाखल झालीये. पुणेकरांनी मोठ्या उत्साहानं या दोन्ही पालख्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी, आदरातिथ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुणेकर बाहेर पडले होते. रात्रभर भजन,किर्तनाने पुण्यनगरीत विठुरायाचा जयघोष झाला.

संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी आहे. तर संत तुकारामांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी आहे. यावेळी पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आजही दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यातच असणार आहे. शुक्रवारी सकाळी पाच वाजता आरती झाल्यानंतर सहाच्या सुमारास माऊलींच्या पालखीचे सासवडकडे, तर तुकोबांच्या पालखीचे सातच्या सुमारास हडपसरकडे प्रस्थान होईल.

वारीत 'आयटी' भाविक... 

दरम्यान, दरवर्षी वारीमध्ये नव नवे  प्रवाह सामील होतायत. दिवसभर संगणक आणि सतत पैशांचा कारभार पाहणारी माणसं म्हणून नेहमीच आयटी वर्गावर शिक्का  मारला जातो. पण हाच वर्ग जेव्हा वारीकडे ओढला जातो तेव्हा त्यांची भावनाही वारकऱ्यांएवढीच सच्ची असते. हाच अनुभव सध्या आयटीतील वारकरी घेतायेत.  तेही या दिंडीत सहभागी झालेत.

.