पुण्यातील स्फोट गंभीर प्रकरण - गृहमंत्री शिंदे

पुण्यात झालेले साखळी स्फोट ही गंभीर बाब आहे. त्यादृष्टीने चौकशी सुरू आहे. आताच या स्फोटाबाबत काही माहिती सांगणे योग्य होणार नाही. कारण केंद्राने आणि राज्याने याची गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय ग़हमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

Updated: Aug 4, 2012, 10:52 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यात झालेले साखळी स्फोट ही गंभीर बाब आहे. त्यादृष्टीने चौकशी सुरू आहे. आताच या स्फोटाबाबत काही माहिती सांगणे योग्य होणार नाही. कारण केंद्राने आणि राज्याने याची गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय ग़हमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

 

सुशीलकुमार शिंदे आज पुणे भेटीवर आले होते. पुणे स्फोटानंतर शिंदे पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत.  टिळक पुरस्कारांचं वितरण करण्यासाठी शिंदे पुण्यात येणार होते. त्याच दिवशी जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या चार स्फोटांनी पुणं हादरलं होतं. गृहमंत्रीपदाचा कारभार स्वीकारावयाचा असल्याने शिंदेंचा तो नियोजित दौरा रद्द झाला होता. पुणे स्फोटात पोलिसांच्या हाती अजूनही फारसे धागेदोरे आलेले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा आजचा दौरा महत्वपूर्ण मानण्यात येत आहे.

 

पुणे स्फोटाबाबत केंद्रातील आणि राज्यातील सर्व एजन्सीज तपास करीत आहेत. स्फोटाची माहिती काढत आहे. दूपवर याची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण दिसते तेवढे सोपे नाही. यापाठिमागे काय सुरू होते. याचाही माहिती घेण्यात येत आहे. स्फोटाबाबत इथपर्यंत धागेदोरे आहेत, अशी माहिती पोहोचवू नका. त्यामुळे बाहेरचे लोक सतर्क होतात. त्यामुळे माझी मीडियाला विनंती आहे, तपासासाठी मदत करावी. उगाच माहिती देऊन तपास कार्यात बाधा आणू नका, असे शिंदे यावेळी म्हणाले.

 

हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी त्याची व्याप्ती काय होती? त्याचा तपास सुरू आहे. तपास यंत्रणांचा रिपोर्ट येऊ दे. मीडियाला याची माहिती दिली जाईल. मात्र, तपास इथपर्यंत आला आहे, असे सांगू नका. मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. आमचे मार्गदर्शन आणि राज्याची माहिती घेवूनच तापस सुरू आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

स्फोटांचा तपास दिशाहीन

पुणे स्फोटांना तीन दिवस उलटले तरी स्फोटांसंदर्भात कुठलाही ठोस निष्कर्ष निघू शकलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण दोघेही आज पुणे दौ-यावर होते. दोघांच्याही वरिष्ठ अधिका-यांबरोबर बैठका झाल्या. पण या बैठकीनंतर दोघांनीही पुणे स्फोटांचा तपास सुरू आहे, ठोस निष्कर्ष हाती लागलेला नाही. अशीच उत्तरं दिली.

 

पुण्यात बुधवारी झालेले स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी ही बाब निश्चितच गांभीर्यानं घेतली जातेय. असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. पण तीन दिवस उलटले तरी स्फोटांचा तपास दिशाहीनच सुरू असल्याचं सध्या तरी चित्र आहे.