निराशा, निराशा आणि निराशा

पर्थ टेस्टमध्ये टीम इंडियाची खराब सुरुवात झालीय. तिसऱ्या कसोटीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुन्हा सर्वांची निराशा केली. सचिनने १५ रन्सवर आऊट झाला. तर सचिन पॅव्हेलियनमध्ये पोहचेपर्यंत टीम इंडियाला चौथा धक्का बसला. गौतम गंभीर ३१ रन्सवर आऊट झाला.

Updated: Jan 13, 2012, 12:40 PM IST

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

www.24taas.com ,पर्थ

 

पर्थ कसोटीत टीम इंडियाची खराब सुरुवात झालीय. तिसऱ्या कसोटीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुन्हा सर्वांची निराशा केली. सचिन १५ रन्सवर आऊट झाला. तर सचिन पॅव्हेलियनमध्ये पोहचेपर्यंत टीम इंडियाला चौथा धक्का बसला. गौतम गंभीर ३१ रन्सवर आऊट झाला.

 

वीरेंद्र सेहवाग शून्यावर आऊट झाल्याने टीम इंडियाला पहिला धक्का बसला. तर 'द वॉल' राहुल द्रविड ९ रन्सवर आऊट होवून दुसरा धक्का बसला.  सेहवाग आणि द्रविड पॅव्हेलियनमध्ये परतलेय. वीरेंद्र सेहवाग शून्यावर आऊट झाला. हिलफेन्हाऊसनं त्याला पॉन्टिंगकरवी कॅच आऊट केलं. त्यानंतर गौमत गंभीर आणि  राहुल द्रविडनं भारताला सुरुवातीला मिळालेल्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ९ रन्सवर द्रविडला बोल्ड करत सिडलनं भारताला दुसरा धक्का दिला.

 

टीम इंडियाची पुन्हा निराशजनक कामगिरी झाली. गौतम गंभीर २२ रन्सवर खेळत असून मैदानात सचिन तेंडूलकर आला आहे. आता पुन्हा महाशतकाची आशा निर्माण झाली आहे. इंडिया,-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात आज ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या कसोटीसाठी टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. आर. अश्‍वीनऐवजी विनयकुमारला संधी देण्यात आली आहे.

 

टीम इंडियाचे फलंदाज डावाची सुरवात कशी करतात यावर कसोटीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. दरम्यान, कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी काही नागरिक खेळपट्टीवर मद्यपान करताना आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.