संदलनंतर त्र्यंबकेश्वर मशिदीचा वाद पेटणार; दर्ग्यात देवी, देवतांचं चिन्ह असल्याचा दावा

त्र्यंबकेश्वरातील मशिद हे नाथ संप्रदाय मंदिर असल्याचा दावा केला जात आहे.   त्र्यंबकेश्वरच्या मशिदीचा सर्व्हे करा अखिल भारतीय संत समितीच्या मागणीने केली आहे. यामुळे नव्या वाद पेटण्याची शक्यता आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 19, 2023, 11:30 PM IST
संदलनंतर त्र्यंबकेश्वर मशिदीचा वाद पेटणार; दर्ग्यात देवी, देवतांचं चिन्ह असल्याचा दावा title=

Trimbakeshwar Controversy : असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच ज्ञानवापीप्रमाणे याही दर्ग्याचं सर्व्हेक्षण करण्याची मागणी करण्यात येत आहे. नाथ संप्रदायाची मागणी योग्य असून त्याचा सर्व्हे झालाच पाहिजे अशी मागणी भाजप आमदार आणि नेते नितेश राणे यांनी केली आहे. 

दर्ग्यात देवी, देवतांचं चिन्ह असल्याचा दावा

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरात जबरदस्ती प्रवेश केल्याचा वाद शमत नाही तोच नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत.  त्र्यंबकेश्वरमधल्या ज्या मशिदीतून संदल मिरवणूक काढण्यात आली ते नाथ संप्रदाय मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. दर्ग्यात देवी, देवतांचं चिन्ह असल्याचाही दावा केला जात आहे. ज्ञानवापीप्रमाणेच पुरातत्व खात्याकडून सर्व्हे करत हे मंदिर ताब्यात देण्याची मागणी महंत अनिकेतशास्त्री महाराजांनी केली. तर दर्ग्यात राहणा-यांनी हा दावा फेटाळून लावलाय. दरम्यान एसआयटी पथकानं या मशिदीची आणि दर्ग्याचीही पाहणी केली. 

हिंदुधर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील संदलचा वाद चांगलाच तापला आहे. अशातच आता ही संदल ज्या मशिदीतून काढण्यात आली त्या मशिदीवरच अखिल भारतीय संत समितीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. ही मशिद आणि त्याच्याजवळ असलेला दर्गा म्हणजे नाथ संप्रदायाचं मंदिर असल्याचा मोठा समितीनं केलाय. शिवाय इथं देवी, देवतांचं चिन्ह असल्याचं सांगण्यात येत आहे.

मशीदीमधील भुयारांमध्ये गणपती आणि इतर देवता

त्र्यंबकेश्वरमधील मशीद हे नाथ संप्रदायाचं मंदिर असून तिथं 3 भुयारं आहेत. या भुयारांमध्ये गणपती आणि इतर देवता आहेत. तिथल्या मजारीवर कमंडलू, त्रिशूल अशी नाथ संप्रदायातील चिन्ह अंकित आहेत.  ज्ञानवापीप्रमाणे पुरातत्व खात्यानं या मशिदीचंही सर्वेक्षण करावं अशी मागणी त्र्यंबकेश्वर मंदिराचे महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी केलीय. तर मशिदीत राहणा-या लोकांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. 

दरम्यान, त्र्यंबकेश्वरमधील संदल वादाप्रकरणी चौकशीसाठी आलेल्या STI पथकानं मशिदीचीही पाहणी केलीय. आता ज्ञानवापीप्रमाणे या मशिदीचंही पुरातत्व सर्व्हेक्षण होणार का? महंतांनी केलेल्या दाव्यानुसार इथल्या मशिदीत नाथ संप्रदायाच्या मंदिराचे पुरावे आहेत का? हे कालांतरानं कळेलच. मात्र यामुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. 

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी एसआयटी चौकशी

त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने प्रवेश केल्याप्रकरणी एसआयटी चौकशी सुरु आहे. एसआयटीचे प्रमुख सुखविंदर सिंग त्रंबकेश्वर मंदिरात दाखल झाले. प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणीही केली. तर मंदिराचा परिसर आणि सीसीटीव्ही फुटेज पाहून तर्कसंगत तपास केला जाणारंय. धूप दाखवण्याची परंपरा आहे की हा कोणी खोडसाळपणा केलाय याबाबतही तपास केला जात आहे. तसंच एसआयटी पथक गेल्या वर्षी घडलेल्या घटनेचीही चौकशी करणार आहे.