जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूला सुवर्णपदक पटकावण्याची संधी

अंतिम फेरीत सिंधूचा मुकाबला माजी विजेती नोझोमी ओकुहारा हिच्याशी होणार आहे.

Updated: Aug 25, 2019, 01:31 PM IST
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूला सुवर्णपदक पटकावण्याची संधी

मुंबई : बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची नामी संधी आली आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूनं धडक मारली आहे. अंतिम फेरीत सिंधूचा मुकाबला माजी विजेती नोझोमी ओकुहारा हिच्याशी होणार आहे. २०१७ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीचा थरार पुन्हा एकदा रंगणार का अशीच उत्सुकता आता बॅडमिंटन चाहत्यांना लागली आहे. 

सिंधूने शनिवारी उपांत्य फोरीत चीनच्या चेन यू फेईचे आव्हान लीलया परतवून लावत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा धडक मारली आहे. त्याचप्रमाणे बी. साईप्रणीतला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

सिंधूनं सुवर्णपदक पटकावलं तर सिंधू इतिहास रचेल. या स्पर्धेत सिंधूनं यापूर्वी दोन रौप्य आणि दोन ब्राँझ पदकं पटकावली आहेत. तब्बल ३६ वर्षांनंतर भारताला भारताला जागतिक स्पर्धेत पदक भूषवणारा साईप्रणीत हा हा प्रकाश पदुकोण यांच्यानंतरचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे.