पुणे : आई बाळाला जन्म देऊन एक पुर्नजन्मच अनुभवत असते. पण मुंबईत घडलेल्या एका घटनेत मुलीनेच आपल्या ब्रेन डेड आईचे अवयव दान करून तिला अनोख्या पद्धतीने कायमचे जिवंत ठेवले आहे.
माय मेडिकल मंत्राने दिलेल्या माहितीनुसार ४३ वर्षीय महिलेचा बारामती - जेजुरी रोडवर अपघात झाला. या अपघातात त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. त्यावेळी मोठ्या हिंमतीने त्यांच्या मुलीने त्यांना अनोख्या पद्धतीने जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीने आपल्या कुटुंबियांच्या मदतीने आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. आणि तिने आईचे हृदय, २ कॉर्नियास आणि स्कीन चार जणांना डोनेट करून त्यांचे प्राण वाचवले.
रूबी हॉल क्लिनिक स्टाफने या ब्रेन डेड महिलेचं हृदय घेऊन दिल्लीपर्यंत प्रवास केला. मुंबई आणि पुण्यात त्यावेळी कोणतीही मागणी नव्हती. ग्रीन कॉरिडोअरच्या सहाय्याने रूबी हॉल क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी पुणे एअरपोर्टपर्यंत अवघ्या ५ मिनिटांत प्रवास केला. रूबी हॉल क्लिनिकच्या ट्रान्सप्लान्ट को-ऑरडिनेटर सुरेखा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही नॅशनल ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लान्ट ऑर्गनायझेनच्या म्हणजे (NOTTO) च्या संपर्कात राहिलो आणि तेथून ते हृदय पुढील शस्त्रक्रियेकरता दिल्लीला रवाना झाले. अवघ्या ५ मिनिटांचा हा पुणे एअरपोर्ट प्रवास फक्त पुणे पोलिसांमुळे शक्य झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
रूबी क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याच रूग्णालयात गेल्या एक महिन्यापासून यकृत ट्रान्सप्लान्टसाठी एक पेशंट वाट पाहत होता. त्याच्यावर मंगळवारी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच कॉर्नियन देखील तेथेच देण्यात आले. आणि महिलेची स्कीन सह्याद्री रूग्णालयातील रूग्णाला देण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात महिलेची किडनी आणि स्वादुपिंड निकामी झाले होते.
त्याचप्रमाणे जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे डॉक्टर त्या महिलेला अपघातानंतर ट्रिट करत होते त्यांच्या म्हणण्यानुसार महिलेमध्ये बरेच दिवस कोणतीही सुधारणा न मिळाल्यामुळे तिला ब्रेन डेड घोषित केलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी महिलेच्या कुटुंबियांना एकतर त्यांचा मृतदेह घेऊन जा किंवा त्यांचे अवयव दान करून त्यांना अनोख्या पद्धतीने जिवंत ठेवा असे सांगितले होते. आणि यावेळी त्यांच्या मुलीने खंबीरपणे पुढे येऊन अवयवदानाचा निर्णय घेतला. आणि चार जणांना जीवनदान दिले.