राशीभविष्य | 'या' राशीच्या नोकरदार वर्गाला पदोन्नतीची संधी

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Feb 17, 2021, 07:13 AM IST
राशीभविष्य | 'या' राशीच्या नोकरदार वर्गाला पदोन्नतीची संधी

मेष- नोकरीच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. सावधगिरीने वागा. हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारपणापासून दूर राहा. अचानक फायदा मिळण्याची शक्यता आहे. साथीदाराची साथ लाभल्याच धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुनं कर्ज फेडाल. वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवा. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. 

वृषभ-  एखाद्या कामाच्या बाबतीत असणारा तणाव कमी होईल. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या चांगल्या संधी आहेत. अर्थार्जनात वाढ होण्याची चिन्हं आहेत. व्यापारात फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गाला पदोन्नतीची संधी आहे. सोबत काम करणाऱ्यांचं सहकार्य मिळेल. साथीदाराचीही मदत मिळेल. काम करण्याच्या पद्धतींमध्ये महत्त्वाचे बदल घडतील. 

मिथुन-  एखाद्या व्यक्तीचा भावनात्मक सहयोग मिळेल. सामाजिक आणि काही सामूहिक कामांसाठी काही व्यक्तींना भेटण्याचा योग आहे. आरोग्यात सुधारणा होईल. ग्रहनक्षत्रांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे आज तुम्ही बऱ्यापैकी उत्साही आणि सक्रिय असाल. नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी जबाबदारी मिळू शकते. काही नव्या व्यक्तींची भेट घडू शकते.

कर्क- अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही बाबतीत अचानक फायदा मिळेल. आत्मविश्वास वाढलेला असेल. एखादा लहानसा अपघात होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही काहीजणांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. नोकरी बदलण्याच्या किंवा जास्त कमाई करण्याच्या मार्गांचा विचार करु शकता. यामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. 

सिंह- व्यापाराच्या निर्णयांमध्ये कोणाचा सल्ला घ्या. एकटेपणापासून दूर राहा. आज मिळणारे पैसे हे येत्या काळासाठी वाचवून ठेवा. साथीदारासोबत एखादा प्रवास घडू शकतो. वरिष्ठांचं सहकार्य तसं कमीच मिळेल. व्यवसायात सावध राहा. जी कामं हाती घ्याल त्यात यश मिळेलच असं नाही. 

कन्या- नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत काही महत्त्वाचे बेत आखू शकता. आर्थिक परिस्थिती सुधारेल. अर्थार्जन वाढवत खर्च कमी करण्यावर भर द्याल. साथीदाराकडून एखादी अनपेक्षित भेट मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. 

तुळ- काहीजण तुमच्या कामाचा विरोधही करु शकतात. साथीदाराची साथ आणि पाठिंबा मिळेल. आज अविवाहितांना विवाहप्रस्तावही येतील. अडकलेली कामं पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये सहकार्य न मिळाल्यामुळे अडचणी येऊ सकतात.  

वृश्चिक- व्यवसायामध्ये फायदे होण्याची चिन्हं आहेत. अडकलेली कामं पूर्ण होतील. नवी कामं करण्याची इच्छा होईल. काही मोठ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. चांगल्या संधीही मिळतील. आज कुठेतरी बाहेर फिरायला जाण्यासाठीचेही बेत आखाल. 

धनु- नोकरदार वर्गाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. व्यापारी वर्गाने सावध राहा. कायदेशीर कामांमध्ये अडकू शकाल. वायवळ कामांमध्ये वेळ जाऊ शकतो. कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा योग येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. 

मकर- जुन्या अडचणी दूर होतील. परिस्थिती अनुकूल असेल. अडकलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत काही नव्या कल्पना मिळतील. उत्साह वाढेल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. साथीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर विश्वास ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. 

कुंभ- काही चांगले आणि महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आणि व्यापारामध्ये इतरांचा सल्ला मिळेल. धनलाब होण्यची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्यांना इतरांची मदत मिळेल.  

मीन- काही कामांमध्ये अडचणी निर्माण होतील. नोकरी बदलण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. विचारपूर्वक निर्णय घ्या. अतिघाई करु नका नुकसान होण्याची चिन्हं आहेत. आर्थिक गुंतवणूकीच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीचा सल्ला घ्या.