close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य १९ एप्रिल २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस      

Updated: Apr 19, 2019, 09:28 AM IST
आजचे राशीभविष्य १९ एप्रिल २०१९

मेष - कोणत्या गोष्टीची रूपरेखा तयार करत असाल तर शांती घ्या. ऑफिसच्या नेहमीच्या कामकाजापेक्षा काही वेगळे कराल, मेहनतीचे फळ मिळेल. मोठ फायदा होण्याची शक्यता आहे. मनातली कामे पुर्ण करण्यासाठी काही काळ लागेल. प्रतिक्षा करावी लागेल. कुटुंबास योग्य वेळ द्या. 
  
वृषभ - तुमचे सल्ले इतरांना प्रभावित करतील. अडकलेली कामे होण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारशक्ती मध्ये बदल होवू शकतो. मित्रांकडून मदत मिळण्याची शक्यता. कुटुंबाची कामे मनपासून कराल. 

मिथुन - जबाबदारीकडे लक्ष द्या. वेळेतच आपलं लक्ष्य साध्य करा. शांतचित्तेने काम करा. मेहनतीचे फळ नक्की मिळेल. नेहमी सकारात्मक भूमिकेत राहा.

कर्क - पैसे कमवण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. पार्ट-टाईम काम मिळण्याची शक्यता आहे. कोणाच्या मदतीने जास्त काम मिळण्याची शक्यता आहे. मागील काही कामांची बाचाबाची संपेल. दुसऱ्यांचे विचार समजण्याचा प्रयत्न करा. चांगली गोष्ट कानावर येईल. 

सिंह - दुसऱ्यांच्या पुढे जाण्यासाठी काम करण्यास उत्साही असाल. कितीही व्यस्त असाल तरी कुटुंबातील व्यक्तींशी फोनवरून कॉन्टॅक्ट ठेवा. काही महत्त्वपूर्ण कामात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्याची नवीन संधी मिळू शकते. अधिक उत्पन्नाचा योग आहे. एखाद्या मांगलिक कामात सहभागी होण्याची शक्यता आहे.

कन्या - दिवस चांगला आहे. भावनांवर संयम ठेवा. जून्या कामांचा जास्त फायदा होईल. जुन्या मित्रांची अचानक मदत होईल. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा बेत आखाल. जी कामं महत्त्वाची आहेत, ती आजच पूर्ण कराल. दिवस शांततेत व्यतीत होईल. कोणती अडचण असेल, तर त्याविषयीची महत्त्वाची सुचना मिळेल

तुळ - बुद्धिमत्तेच्या बळावर अनेक गोष्टी निभावून न्याल. नोकरदार वर्गाला सहकाऱ्यांची मदत मिळेल. सहज पुढे जाल. जी कामं तुमच्यावर सोपवण्यात येतील ती पूर्ण करा. जास्तीच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. 

वृश्चिक - कामे सोप्या पद्धतीने पुर्ण होण्याची शक्यता आहे. तुमचा चांगला प्रभाव लोकांवर पडेल. कामात यश मिळेल. ऑफिसमध्ये काम वाढण्याची शक्यता. साथीदाराकडून मदत मिळेल. घरातल्या अडचणींचे निराकरण होईल. 

धनु - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कामात उत्साह वाढेल. घर आणि आजुबाजुच्या गोष्टींचा निर्णय काळजीपूर्वक घ्याल. पैश्यांच्या मुद्द्यांवर थोडा विचार करा. अडकलेले पैसे मिळतील. साथीदारासोबत बाहेर जाण्याचे योग आहे. सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवाल.

मकर - बेरोजगार लोकांसाठी दिवस चांगला आहे. करियरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. पुरेशा आत्मविश्वासामुळे कामात यश मिळेल. पैसा आणि व्यवसायातील गोष्टीत अधिक लक्ष द्यावे लागेल. सामाजिक सन्मान वाढेल. कौटुंबिक संबंधात सुधारणा होईल. तब्येतीची काळजी घ्या. खर्च वाढू शकतात. 

कुंभ - नोकरी, व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. कामात अडचणी येणार नाहीत. आज केलेल्या कामाचे फळ नक्की मिळेल. करिअर आणि वैयक्तीक आयुष्य चांगले आहे.

मीन - मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. कोणत्याही प्रकारचे गोंधळ संपुष्टात येण्याची शक्यता आहे. पैसे आणि इतर बाबींच्या कामात नफा मिळण्याची शक्यता आहे. दिवस व्यस्त असेल. अनेक जबाबदाऱ्या समोर येण्याची शक्यता आहे.