सरळ रस्ता समजून कॅब चालक नाल्यात घुसला, पावसात मुंबई पालिकेच्या कामाचे वाभाडे

Mumbai Rain: पावसाआधी नालेसफाई करणे, रस्ते नीट करणे अपेक्षित असताना हे काम मार्गी न लावल्यास काय अडचण येऊ शकते याची प्रचिती आज मुंबईत आलीय. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 8, 2024, 10:43 AM IST
सरळ रस्ता समजून कॅब चालक नाल्यात घुसला, पावसात मुंबई पालिकेच्या कामाचे वाभाडे title=
Mumbai cab driver in drain

Mumbai Rain: कालपासून मुंबईत जोरदार पाऊस पडू लागलाय. पावसाळा सुरु झाला की दरवर्षी मुंबई पालिकेच्या कामाचे वाभाडे निघतात. कुठे खड्ड्यांमुळे तर कुठे रस्ता खचल्याने अपघात होतात. पावसाआधी नालेसफाई करणे, रस्ते नीट करणे अपेक्षित असताना हे काम मार्गी न लावल्यास काय अडचण येऊ शकते याची प्रचिती आज मुंबईत आलीय. 

काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली आहे. यात मुंबई महापालिका प्रशासनानं केलेल्या कामाची पोलखोल सुद्धा झाली आहे. सरळ रस्ता समजून एक कॅबचालक सरळमार्गाने गाडी नेत होता. पण तो रस्ता नसून समोर नाला होता. 

मुसळधार पावसाचा रेल्वे प्रवाशांना फटका! ठाण्याच्या पुढे लोकल बंद तर सिंहगड, डेक्कन एक्स्प्रेस रद्द

लोकमान्य टिळक टर्मिनसच्या समोर मोठा नाला आहे. त्या नाल्याला कुठेही संरक्षक भिंत नाही. कालपासून मुंबईत खूप पाऊस पडतोय. पाऊस सुरू असताना ओला कॅब चालक हा सरळ रस्ता समजून नाल्याकडे वळला. आणि त्याची कॅब नाल्यात गेली. सुदैवाने त्याचा जीव वाचला.

लोकमान्य टर्मिनस समोरील हा मोठा नाला धोकादायक ठरला. इमारतींच्या गेटसमोर रस्त्यावरील मोठ्या नाल्याला बाजूची भिंत नव्हती. त्यामुळे ओला चालक थेट पाण्यात गाडी घेऊन गेला. आता क्रेनच्या सहाय्याने ही कार बाजूला काढण्यात आली आहे.

आंबेरी पुलाला भलेमोठे भगदाड; 27 गावांना जोडणारा मार्ग बंद 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x