close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | शनिवार | २५ मे २०१९

कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: May 25, 2019, 09:05 AM IST
आजचे राशीभविष्य | शनिवार | २५ मे २०१९

मेष - अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. तुमची इमेज सुधारण्याची संधी मिळू शकते. दिवस उत्साहवर्धक आणि मनोरंजनात्मक राहील. कौटुंबिक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. घरगुती समस्या सोडवू शकाल. वैवाहिक जीवन सुखकारक राहील. प्रेम वाढेल. जुन्या आजारांपासून आराम मिळू शकतो. 

वृषभ - कामात व्यस्त राहाल. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. मेहनतीने धनलाभ होईल. अर्धवट राहिलेली कामं पूर्ण होतील. दिवस चांगला आहे. अनेक कामात सक्रिय राहाल. पुढे जाण्यासाठी जीवनात काही बदल करावे लागू शकतात. अविवाहित लोकांसाठी दिवस चांगला आहे. प्रवास करावा लागू शकतो.

मिथुन - घाईत कोणतंही काम करु नका. पैशांसंबंधी काळजी करावी लागेल. वायफळ खर्च होऊ शकतो. नोकरी, व्यवसायात समस्या वाढू शकतात. पैशांबाबतीत सावध राहा. तब्येतीची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण राहील. पोटांसंबंधी दुखणं होऊ शकतं. 

कर्क - नोकरीत समस्या होऊ शकते. हट्टीपणामुळे वाद होऊ शकतो. अधिक विचार करण्यात वेळ घालवू नका. अचानक समस्या वाढू शकतात. कामात अडचणी आल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात. तब्येतीत चढ-उतार राहील. धावपळ होईल. काही कामांमध्ये संबंधीत व्यक्तीची मदत मिळणार नाही.

सिंह - कुटुंबात सुख-शांती राहील. सामाजिक कामात सन्मान मिळेल. चांगल्या मित्राची ओळख होण्याची शक्यता आहे. लक्ष दुसऱ्या ठिकाणी राहील. ऑफिसमध्ये गुप्त व्यक्ती तुमची मदत करु शकते. जोडीदार आर्थिक मदत करु शकतो. सोबत काम करणाऱ्यांवर तुमचा प्रभाव पडू शकतो. 

कन्या - व्यवसायात वाढ होईल. सहकाऱ्यांची मदत मिळेल. खास व्यक्तीची भेट होऊ शकते. दररोजच्या कामातून काही वेळासाठी सुटका होऊ शकते. समस्या संपतील. मोठ्या व्यक्तींकडून मदत होईल. दिवसभर थकवा जाणवेल. आराम करा अन्यथा समस्या वाढू शकतात.

तुळ - नोकरी, व्यवसायात लाभ होऊ शकतो. दिवस चांगला आहे. तुमच्या फायद्याचा विचार करा. दुसऱ्यांना दु:खी न करता त्यांच्याकडून काम करुन घ्या. तुमच्या जोडीदारावर खर्च करावा लागू शकतो. जोडीदारावर रागावू नका. कोणावरही तुमच्या भावना जबरदस्ती लादू नका. 

वृश्चिक - व्यवसायात फायदा कमी होईल. बदलीची शक्यता आहे. कोणतंही नवं काम सुरु करु नका. कामाच्या ठिकाणी तुमचं लक्ष विचलित होऊ शकते. विचार केलेली कामं पूर्ण होणार नाहीत त्यामुळे चिडचिड होईल. अविवाहितांच्या संबंधांमध्ये तणाव येऊ शकतो. 

धनु - दररोजची कामं पूर्ण होतील. विचार करुन निर्णय घेतल्याने फायदा होऊ शकतो. पैशांसंबंधी चांगल्या संधी मिळू शकतात. समाजात तुमचं महत्त्व वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल. जेवणात मसालेदार पदार्थांचा उपयोग करु नका.

मकर - दिवसाची सुरुवात ठिक नसेल. इच्छा नसतानाही पैसे खर्च होऊ शकतात. कुटुंबातील लोक कठिण परिस्थितीत टाकू शकतात. तुमच्या योजना गुप्त ठेवा. कोणाशीही शेअर करु नका. वाद होण्याची शक्यता आहे. कामात गती कमी राहील. सुस्त वाटेल. डोकेदुखी आणि पोटदुखी होऊ शकते. जेवण सावधतेने करा.

कुंभ - आर्थिक तंगी कमी होईल. उत्पन्न आणि खर्च बरोबर राहील. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांची मदत मिळेल. कामात तुम्ही संपूर्ण ताकदीने काम कराल. अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या लोकांच्या संगतीचा फायदा होईल. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

मीन - व्यवसायात आज कोणतीही वाढ करु नका. जसं चालू आहे तसंच चालू राहू द्या. महागड्या वस्तूची खरेदी होऊ शकते. सावध राहा. पैसे खर्च करताना अतिशय चतुराईने खर्च कराल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. थकवा आणि अपूर्ण झोपेमुळे समस्या वाढू शकतात.

- डॉ. दीपक शुक्ल