Ganesh Chaturthi 2024 : गणेश मूर्ती कशी असावी? गणपतीची मूर्ती शाडू मातीचीच का हवी?शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला बाप्पा आणावा का?

Ganesh Chaturthi 2024 : बाजारात गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या रुपाचे, विचित्र आकार आणि उंच उंच मूर्ती मिळतात. मग अशावेळी गणेश चतुर्थीला गणेशमूर्ती कशी असावी याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर काय सांगतात जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Sep 1, 2024, 04:21 PM IST
Ganesh Chaturthi 2024 : गणेश मूर्ती कशी असावी? गणपतीची मूर्ती शाडू मातीचीच का हवी?शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला बाप्पा आणावा का? title=
Ganesh Chaturthi 2024 How should Ganesh idol be Why should the idol of Ganapati be made of shadu clay

Ganesh Chaturthi 2024 : श्री गणपती अथर्वशीर्षात गणेशाचं रुप सांगण्यात आलं. एकदन्तं चतुर्हस्तं..! म्हणजे एकदंत चतुर्भूज, पाश आणि अंकूश धारण करणारा, एका हाती मोडलेला दात धारण करणारा आणि दुसऱ्या हाताची वरदमुद्रा असलेला, ज्याचा ध्वज मूषकचिन्हांकित आहे. असा लाल वर्ण, लंबोदर, सुपारासारखे कान असलेला, लाल वस्त्र नेसलेला, अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप लावलेला आणि लाल पुष्पांनी पूजन केलेला बाप्पा...(Ganesh Chaturthi 2024 How should Ganesh idol be Why should the idol of Ganapati be made of shadu clay )

शास्त्र सांगतं की, गणेश ही मुख्यत्वे ज्ञानाची म्हणजे विद्येची देवता मानली जाते. मोदक हे ज्ञानाचं प्रतीक आहे. या कारणामुळे बाप्पाच्या हातात मोडलेल्या दाताच्या स्थानी मोदक दाखवण्याची पद्धत पडली असावी. 

शास्त्रानुसार बनवलेली मूर्ती सात्त्विक का असते?

मूर्ती देवतेच्या मूळ रुपाशी जितकी साम्य असणारी असेल, तितके तिच्याकडे त्या देवतेचे तत्त्व जास्त प्रमाणात आकृष्ट होते. ऋषीमुनी आणि संत यांनी शास्त्रं लिहिली आहेत. त्यांना देवतांचा जसा साक्षात्कार झाला, तशी त्यांनी देवतांची वर्णने शास्त्रांत केली आहेत. म्हणून शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे मूर्ती बनवल्यास ती सात्त्विक होते. 

गणपतीची मूर्ती शाडूमातीचीच का हवी? धर्मशास्त्र काय सांगतं...

धर्मसिंधु हा ग्रंथ विविध स्मृतिग्रंथांचं संकलन करुन बनवलेला आहे. यात गणपतीची मूर्ती कशी अशावी असं सांगण्यात आलं. 

तत्र मृन्मयादिमूर्तौ प्राणप्रतिष्ठापूर्वकं विनायकं षोडशोपचारै सम्पूज्य...!

याचा अर्थ असा की,  भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाच्या मातीपासून बनविलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापना करुन षोडशोपचार पूजा करावी. 

तर स्कंद पुराणानुसार गणेशाच्या पूजेसाठी स्वत:च्या ऐपतीप्रमाणे सोनं, चांदी किंवा माती यांची मूर्ती बनवावी. त्यामुळे अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य मानले गेले आहे. 

पंडित आनंद पिंपळकर सांगता की, गणपतीची मूर्ती ही 1 फूटापेक्षा जास्त नसावा. मूर्ती एका व्यक्ती आणता नेता येईल इतकी सहज असावी. सिंहावर विराजमान, लोंडला टेकून अतिशय आरामात अवस्थेतील गणेशाची मूर्ती ही सर्वउत्तम असते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्वांगसुंदर गणपती असावा.

गणपतीच्या बाजूला उंदर असावा. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना चित्रविचित्र आकाराचे गणपती हिरो, पुष्पा फ्रेम अशाप्रकारचे गणपती नसावेत. त्याचबरोबर शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणेशाची मूर्ती घेऊ नये. कारण शास्त्रात शिव पार्वतीच्या मूर्तीची पूजा करत नाहीत. शंखात बसलेला, उंदरावर बसलेला, अवघडून बसलेला, लहान बाळासारखा, बंदूक घेतलेला असा गणेशाचा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करु नका.