Ganga Saptami 2024 Shubh Muhurta : हिंदू धर्मात गंगाजलला अतिशय महत्त्व असून पवित्र मानलं जातं. या गंगा मातेचा जन्म वैशाख शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला असतो. ही तिथी गंगा सप्तमी म्हणून साजरी करण्यात येते. यंदा गंगा सप्तमीला ज्येष्ठ संक्रांतीचा शुभ योग जुळून आलाय. (Ganga Saptami shubh muhurt Puja Vidhi Significance Do These Remedies or upay success delay in marriage)
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी ग्रहांची विशेष हालचाल पाहिला मिळणार आहे. या दिवशी गंगा नदीच्या काठावर अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गंगा जयंतीनिमित्त घरी गंगा पूजा करणेदेखील शुभ मानले गेले आहे. यंदा गंगा सप्तमीला सूर्य संक्रांतीचा शुभ संयोग जुळून आलाय.
हिंदू पंचांगानुसार गंगा सप्तमी तिथी 13 मे ला संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांपासून 14 मे 2024 ला संध्याकाळी 6 वाजून 49 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार गंगा सप्तमी ही 14 मे ला साजरी करण्यात येणार आहे.
गंगा सप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. घरात गंगा देवीचे चित्र किंवा फोटो लावून हार आणि फुलं अर्पण करा. आता गंगा देवीची आरती करुन दीपदान करा. या काळात सहस्त्रनाम स्त्रोत आणि गायत्री मंत्राचा जप करणे अंत्यत शुभ मानलं जातं.
धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णुच्या पायांतील घामाच्या थेंबातून गंगा देवीचा जन्म झालाय असं पौराणिक कथेतून सांगण्यात आलंय. ब्रह्मदेवाने भगवान विष्णूचे पाय धुवून ते पाणी आपल्या कमंडलूत भरले त्यानंतर गंगा देवीची जन्म झाला अशी मान्यता आहे. त्या दिवशी वैशाख शुक्ल सप्तमी असल्याने यादिवशी गंगा सप्तमी साजरी केली जाते.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यश मिळवण्यासाठी गंगा सप्तमीच्या दिवशी सकाळी मंत्रोच्चार आणि गंगापूजन करा. यशाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी फुलं आणि दिवे अर्पण करण्याबरोबरच इच्छापूर्तीसाठी दूधही अर्पण करा.
लग्न जुळण्यास उशीर होत आहे तर गंगा सप्तमीच्या दिवशी, शास्त्रानुसार एका कलशात पाच बेलाची पाने घेऊन महादेवाची पूजा करा. हा उपाय केल्यास इच्छापूर्ती होईल. या पूजेत गंगाजल अवश्य वापर करावेत.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)