Navampancham Yog / Venus Ketu Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आणि नक्षत्र आपल्या वेळोवेळी आपली स्थिती बदलत असतात. त्यातून अनेक योग निर्माण होतात. काही योग हे शुभ असतात तर काही जाचकांसाठी तो अशुभ ठरतात. आज 7 नोव्हेंबरला गुरु आणि चंद्राचा अतिशय शुभ संयोग निर्माण झाला आहे. आज गुरु आणि चंद्र एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात असणार आहे. त्यामुळे या स्थितीतून नवमपंचम योग निर्माण झाला आहे. तर पंचांगानुसार चंद्र सूर्याच्या राशीत सिंहमध्ये आहे. तर कन्या राशीमध्ये केतू आणि शुक्राचा संयोगही होणार आहे. या योगामुळे 5 राशींना अचानक धनलाभ होणार आहे. (guru chandrama Navampancham Yog and Venus Ketu Yoga will be give money benefits 5 luckiest zodiac sign)
या राशीच्या लोकांना चांगला लाभ होणार आहे. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. नोकरदार लोकांची चांगली प्रगती होणार आहे. कुटुंबासोबत आनंदायी क्षण घालविणार आहात. हातात घेतलेल्या कामात यश येणार आहे.
मंगळवार उपाय : शत्रू आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी व्रत करणे फायद्याचे ठरणार आहे. त्याशिवाय हनुमान मंदिरात 21 दिवस बजरंगबाण पाठ करणेदेखील उपयुक्त ठरेल.
नोकरदारांना आज कामाच्या ठिकाणी उत्तम संधी मिळणार आहे. त्यांच्या कामाचं कौतुकही होणार आहे. वडीलधारी व्यक्तींकडून तुम्हाला आशिर्वाद प्राप्त होईल. तुम्हाला मालमत्ता मिळण्याचे योग आहेत. जोडीदारासोबत काही नातेवाईकांच्या ठिकाणी जाणार आहात. तुमचं मनोबल वाढणार आहे. मुलांच्या तब्येतीत सुधारणा होणार आहे. या योगामुळे मन शांत आणि प्रसन्न असेल.
मंगळवारचा उपाय : संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी 11 पिपळाची पानं स्वच्छ करून त्यावर चंदनाने श्रीराम लिहून हनुमानजींना अर्पण करणे फायदेशीर ठरणार आहे.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ आहे. हनुमानजींच्या विशेष कृपेने या लोकांवरील सर्व संकटं दूर होणार आहे. मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार असल्याने आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात यश मिळणार आहे. तुमची दिवाळी प्रसन्न आणि आनंदायी जाणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीसोबत तुमचा मान सन्मान वाढणार आहे.
मंगळवारचा उपाय : वादातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानजींना 11 परिक्रमा घाला. त्यानंतर हनुमान चालीसा पाठ करुन हनुमान मंत्रांचा जपही करा.
या राशीचे लोक पैसे मिळविण्यासाठी चांगले प्रयत्न करतील आणि कठोर परिश्रमाने नवीन उंची गाठण्यात यशस्वी होणार आहेत. अविवाहित लोकांच्या आयुष्यात कोणीतरी खासची एन्ट्री होणार आहे. मालमत्ता किंवा गाडी खरेदीचे योग जुळून आले आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे.
मंगळवारचा उपाय : भाग्य वाढवण्यासाठी हनुमानजीसमोर पाण्याचे भांडे ठेवून 21 दिवस हनुमान बाहुकचा पाठ करा. त्यानंतर ते पाणी सेवन करा. हा उपाय दररोज करा.
या राशीच्या लोकांना अनपेक्षित यश मिळणार आहे. तर त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होणार आहे. जर तुम्ही सामाजिक कार्याशी निगडीत असाल तर तुम्हाला शुभलाभ होणार आहे. मुलं आपली जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी होणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून लग्नाची गोड बातमी मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश प्राप्त होणार आहे.
मंगळवारचा उपाय : शुभ फळ मिळण्यासाठी लाल रंगाचे कपडे परिधान करणे उपयुक्त ठरेल. तर त्याशिवाय हनुमानजींना गूळ आणि हरभरा अर्पण करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)